धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रामदेवजी बाबा नगरमधील रहिवाशी तथा बालकवी ठोंबरे विद्यालयाची विद्यार्थिनी रितिका सुजित वाघरे हिने १० वीच्या बोर्ड परीक्षेत ९०.६२ टक्के मिळवीत घवघवीत यश मिळविले आहे.
विद्यार्थिनी रितिका वाघरे हिला ९०.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. मागासर्गीय मेहतर परिवारातील ९० टक्कें पेक्षा जास्त गुण मिळविणारी ती पहिलीच विद्यार्थिनी होय. तिच्या या यशा बद्दल धरणगाव परिसरात तिचे कौतुक, अभिनंदन होत आहे. रितिका ही पालिका कमर्चारी सुजित वाघरे यांची कन्या आहे.