चोपडा (प्रतिनिधी) जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने तालुक्यातील काझीपुरा येथे कापूस बियाण्याची विक्री करणाऱ्या रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी बियाणे विक्री करणारे दत्तात्र्यय शालीग्राम पाटील (रा. काझीपुरा ता. चोपडा), सदर बियाण्याचे उत्पादक कंपनी, सदर बियाण्याचे कंपनीचे मालक, वाहतूकदार, जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अरुण श्रीराम तायडे (वय ५३ जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक (रासायनिक खते बियाणे व कीटकनाशके) द्वारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दत्तात्र्यय शालीग्राम पाटील याच्या काझीपुरा येथील राहते घरी तसेच काझीपुरा फाट्यावर व प्रवीण पाटील यांचे हातेड येथील लक्ष्मी गॅरेजवर बनावट कापूस बियाणे मिळून आले आहे. महाराष्ट्र शासनाने उत्पादन, वितरण, विक्रि करण्यास प्रतिबंधित केलेले HTBT कापुस बियाणे PINK COTT हायब्रेड कापुस बियाणे विक्री करतांना दत्तात्र्यय पाटील आढळून आला. दरम्यान, घटनास्थळावरून ४ लाख १६ हजार २५० रुपये किंमतीचे ३३३ HTBT कापूस बियाणे तसेच PINK COTT हायब्रेड कापूस बियाणे एका पाकिटाचे वजन ४५० ग्रॅम तर त्या पाकिटाची किंमत १२५० रुपये, असा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील उत्पादक कंपनीचे मालक यांनी सदर बियाणे उत्पादन करुन विक्री करण्यास दिले म्हणून सदर बियाण्याचे उत्पादक कंपनी, सदर बियाण्याचे कंपनीचे मालक, वाहतूकदार, जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय येदे हे करीत आहेत. दरम्यान, यावेळी थेट उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकासह वाहतूकदारांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाल्यामुळे अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.