TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील यांचा झाला सन्मान

सेवापूर्ती सोहळ्यात संजय पाटील यांनी घेतले ११ गरीब विद्यार्थ्यांना दत्तक !

vijay waghmare by vijay waghmare
April 5, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी/धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी)– धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी आपल्या सेवेला औपचारिक निरोप दिला. मात्र हा सोहळा केवळ त्यांच्या निवृत्तीचा नव्हता, तर एका ध्येयवेड्या शिक्षकाच्या कर्तृत्वाचा, निस्वार्थ सेवाभावाचा आणि माणुसकीच्या नात्यांचा उत्सव होता.

कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील सरांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय सरांची ही नोकरी नव्हती, तर विद्यार्थ्यांना घडवण्याचा एक ध्येयात्मक प्रवास होता. सेवा ही नोकरी नसते… ती एक तपस्या असते, समर्पण असतं. शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अमूल्य योगदान दिलं. केवळ पुस्तकांपुरतं ज्ञान न देता, चारित्र्य, कष्ट, आणि आत्मविश्वास यांचे धडे देणारे ते शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत. ते शिक्षक, मार्गदर्शक, पालक आणि स्नेही अशा अनेक भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडत आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

संजय पाटील यांनी घेतले ११ गरीब विद्यार्थ्यांना दत्तक

याच शाळेतून सेवानिवृत्त होत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकीचं एक भावनिक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. या शाळेतील ११ गरीब व होतकरू मुला-मुलींचा पदवीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च मी उचलणार आहे,” अशी थेट घोषणा करत त्यांनी उपस्थितांचं अंतःकरण जिंकलं.एव्हढेच नाही तर त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश शाळेला सुपूर्द केला. यावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे डोळे पानावले होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी संजय पाटील सर हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणूनही अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. शिक्षण, सामाजिक सलोखा, आणि जनसेवा या त्रिसूत्रीवर त्यांनी आपलं आयुष्य उभं केलं आहे असे सांगितले

कार्यक्रमाच्या अखेरीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत म्हटलं, “ध्येय आणि ऊर्जा तीच ठेवा, अजूनही समाजासाठी खूप लढायचं आहे. निवृत्ती ही केवळ सरकारी संकल्पना असते – कार्य करणारा माणूस कधीच सेवानिवृत्त होत नाही.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय पाटील सर यांचा सपत्नीक सहपरिवार शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत जी सोनवणे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी संजय पाटील सर यांचा सत्कार सत्कार केला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार भाजपाचे ज्येष्ठ नेते डी जे पाटील सुभाष अण्णा पाटील मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे रवींद्र चव्हाण सर रमेश आप्पा पाटील राजेंद्र चव्हाण हेडगेवारचे उपसरपंच चंदन पाटील दिलीप बापू पाटील संचालिका संस्थेच्या संचालिका रेखाताई पाटील महेंद्र भोईटे वाय.पी पाटील सुनील पाटील प्रेमराज पाटील धनराज पाटील सर प्राध्यापक अशोक पवार नाटेश्वर पवार गजानन पाटील खैरनार सर घुगे सर किशोर पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील संजय माळी, चोरगावचे सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे , भागवत पाटील, सुभाष पाटील, गुलाब पाटील सर, शांताराम पाटील , आनंदा पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी उपस्थिती देऊन संजय पाटील सरांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात संजय सरांचे जुने सहकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या साऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा क्षण एक प्रेरणादायी, भावनाशील आणि संस्मरणीय सोहळा ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव पाटील सर यांनी केले प्रास्ताविक धनराज पाटील सरांनी तर आभार पी.ए. पाटील सर यांनी मानले. दोनगाव येथील माध्यमिक विद्यालयात सदरचा सेवानिवृत्तीचा नव्हे तर कर्तुत्वाचा सोहळा पार पडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: chopadagulabrao patil

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 06 एप्रिल ते 12 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सख्ख्या भावाचा खून ; लासूर येथील भयंकर घटना

January 10, 2021

बीएचआर घोटाळा : अटकेतील अनेक आरोपी पैसे भरायला तयार !

June 29, 2021

काँग्रेसच्या ९९ खासदारांना अपात्र ठरविण्याची याचिका !

August 11, 2024

ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी-पोलिसांत संघर्ष; शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले

January 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group