धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी बु येथे शिवस्वराज्य दिन साजरा केला नाही, म्हणून सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई करून पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मुस्तकीम मासुम पटेल, सोकात कालु पटेल यांनी जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, धरणगाव प.स. गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे कंडारी बु. येथे शिवस्वराज्य दिन साजरा केला नाही. तसेच झेंडा (गुडी) उभारली नाही. त्यामुळे मौजे कंडारी बु. येथील सरपंच कौसरबी हिलाल पटेल व उपसरपंच शकील वेडू पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पदावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, सरपंच आणि उपसरपंच यांनी शिवस्वराज्य दिवस साजरा केला असल्याचे म्हटले आहे.