बागपत (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात कर्जात बुडालेल्या एका छोट्या व्यावसायिकानं फेसबुकवर लाईव्ह येत विषप्रश्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिची पत्नी अडवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यांनतर त्याच्या पत्नीनेही विष प्रश्न केलं. यामध्ये महिलेचा जीव गेला आहे. राजीव तोमर असं आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिकाचे नाव आहे.
तोमर यांच्या आत्महत्येचा हा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्यासह सर्व नेत्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. जेव्हा राजीव तोमर लाइव्ह येतो आणि विष प्राशन करतो, तेव्हा त्याची पत्नी त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र, राजीव तोमर यांनी विष प्राशन केल्यानंतर, त्यांच्या पत्नीनंही विष प्राशन केलं आणि ३८ वर्षीय पूनम तोमरला आपला जीव गमवावा लागला.
राजीव तोमरनंच हा व्हिडिओ शेअर केला असून मी देशद्रोही नाही, देशावर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) लाज वाटायला पाहिजे, असं त्यांनी लाइव्ह व्हिडिओत म्हंटलंय. पंतप्रधानांनी आमची सर्व कामं बिघडवली आहेत. मोदींच्या विविध निर्णयामुळं लहान दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
स्थानिक वृत्तपत्रांनुसार, राजीव तोमर आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांच्यावर ३२ लाखांचं कर्ज होतं. राजीव तोमर हे कासिमपूर खेडी गावचे रहिवासी असून बरौत येथील सुभाष नगर कॉलनीत राहतात. त्यांचे बावली रोडवरील बरौत येथे बुटांचं शोरूम आहे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळं छोटे व्यापारी देशोधडीला लागल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष करत आहेत. मोदी सरकारनं ज्या प्रकारे जीएसटी लागू केला, नोटाबंदी लागू केली, त्याचा मोठा फटका छोट्या दुकानदारांना, लघुउद्योगांना बसला असून त्यामुळं ते कर्जबाजारी झाले असून, अनेक जण आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहेत, असे विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.