TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाईच्या पत्र प्रवासात अडकला माध्यमिक शिक्षकांचा पगार

शिक्षकांचे पगार लवकर होण्यासाठी शिक्षक पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी घेतला पुढाकार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचा माहे डिसेंबर २०२१ चा पगार आज २० जानेवारी येऊन ही अद्याप झालेला नसून जिल्ह्यात ३९१ शाळांचे पगार नाही.

या संदर्भात माहिती घेतली असता कोषागार कार्यालयात वेतन बाबत प्रक्रिया पूर्ण झालेली आहे शिवाय अनुदान देखील उपलब्ध असल्याचे समजते. मात्र शिक्षण संचालक पुणे यांच्याकडून शाईचे पत्र आल्याशिवाय पुढील कार्यवाही होत नाही. जानेवारी महिन्याचे शेवटचे दहा दिवस बाकी असून अद्याप पगार झालेले नाहीत. या शाईचे पत्र प्रवासात शिक्षकांचे पगार रखडले आहेत.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

यापूर्वी एक तारखेला पगार होतील अशी अनेकदा वल्गना झालेली आहे. संघटनांना शासनाने शब्द दिलेला आहे उशिरा पगार झाल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागते. उशिरा वेतन मिळाल्याने पतसंस्थांच्या अधिकच्या व्याजाचा बोजा कर्मचारी वर्गाला सहन करावा लागत आहे. एकीकडे शासनाने गतिमान प्रशासनावर भर दिलेला आहे. मात्र वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या शाईची प्रत पुणे ते जळगाव प्रवास विलंबाने करते यासाठी जबाबदार कुणाला धरावे?, असा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे. वेतनाची बिले शाळांमधून वेतन पथक, वेतन पथकातून ट्रेझरी, ट्रेझरी मधून पुन्हा वेतन पथक, वेतन पथकातून जिल्हा बँक आणि जिल्हा बँकेतून शाखा निहाय रवाना होत असतात. एव्हढ्या दिव्य प्रवासात पुन्हा शाईची अडचण आलेली आहे. यामुळे शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी शाई बाबत फारसे कुणाला माहीत देखील नव्हते मात्र आताच शाई चा प्रवास असा लांबणीवर का पडायला लागला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या संदर्भात वेतन पथकचे अधीक्षक शर्मा यांच्याशी संपर्क केला असता, अनुदान रिलीज ऑर्डरचे मूळ स्वाक्षरी असलेले पत्र कोषागार कार्यालयाला प्राप्त झाल्यशिवाय कोषागार अधिकारी बिले पास करीत नाही. आज सदर पत्र घेवून कर्मचारी पुण्याहून निघालेला आहे. उद्या कोषागार कार्यालयात जमा होईल त्यानंतर बिले पास होतील. हा सर्व प्रक्रियेचा भाग आहे यात कुणीही काहीही करू शकत नाही. असे सांगण्यात आले.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी आवश्यक ती पूर्तता वेळीच करावी, अशी मागणी तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता म्हणाले की, शाळेचे पत्र आज प्राप्त झाले असून येत्या सोमवार पर्यंत शिक्षकांचा पगार होईल असे सांगितले.

ऑनलाईन पद्धतीने पगार जमा व्हावेत यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार – सुधीर तांबे

जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे पगार झालेले नसून येत्या सोमवार पर्यंत पगार होतील असे वेतन अधीक्षक यांनी सांगितले.
लवकरच शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होतील वारंवार त्यांच्याशी बोलून लवकरच पगार जमा करण्यात येणार आहेत. एक तारखेला ऑनलाईन पद्धतीने पगार जमा व्हावेत यासाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे नाशिक पदवीधर शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी सांगितले.

प्रत उशिरा प्राप्त झाल्याने पगाराला उशीर – एम.एच.चौधरी

या महिन्याच्या पगारासाठी लागणारे अनुदान आतापर्यंत उपलब्ध नव्हते. त्यातल्या त्यात आॅनलाईन प्रणालीमुळे शिक्षण संचालकांची स्वाक्षरी असलेली प्रत मिळणे आवश्यक असते. नेमकी तिच प्रत उशिरा प्राप्त झाल्याने पगाराला उशीर होत आहे. असं विद्या समितीच्या सचिव एम.एच.चौधरी यांनी सांगितले.

शासनाच्या धोरणानुसार आणि संघटनांना दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा होणे अपेक्षित आहे, मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे वेतन उशीरा होते. कधी अनुदान तर कधी शाईची प्रत अशी वेगवेगळी कारणे अधिकारी देत असतात. यामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पंधरा तारखेनंतर वेतन झाल्यास सर्व कर्जदार शिक्षक शिक्षकेतर यांना पतसंस्था अथवा बॅकेचे अतिरिक्त व्याज भरावे लागते आहे.

डॉ. संजीवकुमार सोनवणे (मुख्याध्यापक, पी. आर. हायस्कूल, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

कोकणासह मध्य महाराष्ट्रात २३, २४ जानेवारीला पावसाची शक्यता ; तज्ज्ञांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तर महाराष्ट्र माथाडी असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी संदीप मांडोळे यांची निवड

August 11, 2021

भाजपमध्ये सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडे यांचा झाला : खडसे

May 11, 2021

भुसावळातील दाम्पत्याचा अहमदाबाद येथे रेल्वेखाली आल्याने मृत्यू !

December 17, 2022

शासनपति श्रमण भगवान श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सवा अंतर्गत ‘ट्रेझर हंट’ चा यशस्वी कार्यक्रम !

April 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group