TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेल्फी काढला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; चार जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू !

कंटेनरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) मुंबईहून नाशिकमार्गे धुळ्याकडे परतताना चांदवडनजीक धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह त्यांच्या तीन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाला. हृदयद्रावक म्हणजे अपघातापूर्वी काही मिनिटे आधीच चौघांनी सेल्फी काढला होता. त्यांचा हा फोटो दुर्दैवाने अखेरचा ठरला.

महसूल विभागात सेवेत असलेल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त किरण अहिरराव व त्यांचे तीन मित्र चांदवडला आले होते. त्यानंतर ते मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेले त्यांचे मित्र भूषण देवरे यांना भेटण्यासाठी गेले. सोमवारी (दि. १८) मुंबईहून धुळ्याकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. कारच्या बोनेटपासून मागच्या सीटपर्यंतचा कारचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला आहे. तर धडकेनंतर या कारचे छप्परही पूर्णपणे उखडले गेले आहे. अपघाताचे वृत्त धुळ्यात धडकताच मृतांच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने चांदवडकडे धाव घेतली. दुपारी ४ पर्यंत चौघांचे मृतदेह अवधान व धुळे येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर नगरसेवक किरण अहिरराव यांच्यावर सायंकाळी धुळ्यात, कृष्णकांत माळी यांच्यावर मोघ येथे तर अनिल पाटील व प्रवीण पवार यांच्यावर अवधान येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदवड शिवारातील सोग्रस फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत झालेले किरण अहिरराव, प्रवीण पाटील, अनिल पवार आणि कृष्णकांत माळी हे चौघेही जिवलग मित्र. किरण हरिश्चंद्र अहिरराव (वय ४८ रा. महिंदळे शिवार, साक्री रोड, धुळे) हे धुळ्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश अहिरराव यांचे लहान बंधू होतं. धुळे महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत किरण अहिरराव हे भाजपाच्या तिकीटावर प्रभाग क्र. ६ मधून निवडून आले होते. तसेच त्यांच्या पत्नी भारती अहिरराव यादेखील यापूर्वी दोनवेळा धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. किरण अहिरराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण, असा परिवार आहे.

“कृष्णकांत चिंधा माळी हे मोघण येथील ज्ञानज्योती विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक चिंधा माळी यांचे सुपूत्र होते . मोघणचे माजी उपसरपंच असलेले कृष्णकांत हे सदर संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कृष्णकांत हे बाबा नावाने परिचित होते. कोरोना काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
Next Post

चाळीसगावचा लाचखोर अभियंत्याच्या धुळ्यातील बंगल्यातून २७ तोळे सोने जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा ; रामदास आठवलेंची मागणी

July 29, 2021

राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

December 22, 2021

चाळीसगाव नगरपरिषदेचा स्वच्छता प्र‍िमीअर लीगचा अनोखा उपक्रम !

December 6, 2023

जांभोरा रेल्वेगेट सोमवारपासून पाच दिवस राहणार बंद !

October 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group