TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : भुसावळ आणि मनमाड येथे ५९ अल्पवयीन मुलांची सुटका ; पाच संशयित ताब्यात !

भुसावळला २९ तर मनमाडला ३० मुलं उतरवली ; बिहारकडून पुणे आणि सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2023
in गुन्हे, भुसावळ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ५९ अल्पवयीन मुलांची आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने सुटका केली आहे. बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना भुसावळ रेल्वेस्थानकावर तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयित ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. तर भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद (पेठभाग वालवा मस्जीद, आस्ठा मस्जीद आस्ठा जि.सांगली) असे आहे.

रेल्वे बोर्डाकडून आलेल्या संदेशावरून सुरक्षा दल – लोहमार्ग पोलिसांनी बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना दानापूर-पुणे एक्स्प्रेसने पुण्यासाठी निघालेल्या या ८ ते १५ वयोगटातील मुलांना भुसावळ रेल्वेस्थानकात मंगळवारी दुपारी उतरवण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलांनी मिरजमधील मदरशात नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. मुलांसोबत पोलिस निरीक्षक विजय घेरडे, निरीक्षक मीणा यांनी संवाद साधला. दरम्यान, या प्रकरणी एकाविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनमाडला देखील अशाच पद्धतीने काही ३० मुलांची सोडवणूक करण्यात आल्याचीही माहिती समोर येतेय. दानापूर-पुणे एक्स्प्रेसने पुण्यासाठी निघालेल्या ८ ते १५ वयोगटातील मुलांना मदरशात की अन्य कुठे घेऊन जाण्यात येत होते?, याची सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू असल्याचे कळते. त्यानुसार मुले कुठून आली, कुठे जात आहेत याची माहिती संकलित करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

मंगळवारी दुपारी ही गाडी भुसावळ जंक्शनवर येण्यापूर्वी रेल्वे बोर्डाकडून भुसावळ सुरक्षा रक्षक दलास संदेश आला. त्यानुसार आरपीएफ आर. के. मीणा, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भाऊसाहेब मगरे व पोलिस पथकाने दुपारी ३.३० वाजता २९ मुलांना गाडीतून खाली उतरवले. दरम्यान, गाडीतून उतरवलेली मुले सकाळपासून उपाशी होती, त्यामुळे आरपीएफ, जीआरपी पोलिसांनी सर्व मुलांना जेवण दिले. नंतर त्यांची चौकशी करण्यात आली. तर रेल्वेत आणखी काही अशाच पद्धतीने मुलं तर नाही ना?, याच्या चौकशीसाठी एक पथक रेल्वेत बसवण्यात आले. धक्कादायक म्हणजे मनमाड येथे तब्बल ३० मुलांसह चार संशयित ताब्यात घेण्यात आले.

वेगवेगळ्या डब्यांमधून एका तस्करासह 8 ते 15 वर्षे वयोगटातील 29 मुलांना ताब्यात घेतले !

भुसावळ रेल्वे गाडी आल्यावर रेल्वे पोलिसांनी तपासणी केली आणि वेगवेगळ्या डब्यांमधून एका तस्करासह 8 ते 15 वर्षे वयोगटातील 29 मुलांना ताब्यात घेतले. मनमाडपर्यंत केलेल्या पुढील तपासादरम्यान आणखी 30 मुले आणि 4 तस्करांची ओळख पटली आणि त्यांना मनमाड स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्याचे कळते. वैद्यकीय तपासणीनंतर सुटका करण्यात आलेल्या २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत बालगृह (जळगाव) येथे सुटका करण्यात आलेली मुले सुपूर्द करण्यात आली. तर मनमाड येथे सुटका करण्यात आलेली मुले चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ/नाशिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आयपीसी 370 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी भुसावळ स्थानकावर संशयित आरोपी मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद याची चौकशी करून संबंधित मुलांचे आणि त्याच्या स्वतः च्या ओळखीची कागदपत्र मागितली असता तो देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. तर मनमाड येथून समोर आलेल्या माहिती नुसार संशयित पाचही जण शिक्षक असून हे सर्व विद्यार्थी आहेत. तसेच एका सह प्रवाशाने ट्वीट केल्यानंतर सर्व संशय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. परंतू अंतिम सत्य पोलीस चौकशीतूनच समोर येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

यावल : गुरांना धरणावर पाणी पाजण्यासाठी आणले अन् घडला अनर्थ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय डॉजबाॅल पंच परीक्षेत क्रीडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यशस्वी !

January 16, 2024

तुला जे द्यायचे ते दे’… म्हणत १५ हजारांची घेतली लाच ; लाचखोर अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ

April 6, 2025

जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

October 15, 2022

कारसेवकांच्या योगदान व बलिदानातून श्रीराम मंदीराची उभारणी : ना. गुलाबराव पाटील !

January 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group