TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : सांगलीच्या रिलायन्स ज्वेल्सवर भरदिवसा सिनेस्टाईल सशस्त्र दरोडा !

पोलीस म्हणून आले, कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले ; अवघ्या पंधरा मिनिटात कोट्यांवधीची लुट !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) सांगली-मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर भरदिवसा गोळीबार करीत आठ ते दहा दरोडेखोरांनी सिनेस्टाईल दरोडा टाकत साधारण १३ कोटींचे दागिने लुटून नेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करून शोरूममध्ये प्रवेश मिळवीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय, तोंड बांधून ठेवत लुटपाट केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्ह्यात सगळीकडे नाकाबंदी केली.

पोलिस असल्याचे सांगत शोरूममध्ये शिरले !
मार्केट यार्डजवळ वसंत कॉलनीत तसेच जिल्हा पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रिलायन्स ज्वेल्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर एका वाहनातून आले. पोलिस असल्याचे सांगत ते शोरूममध्ये शिरले. त्यानंतर आम्हाला तपासणी करायची असल्याचे सांगत शोरूम व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी जमा केले. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर २० कर्मचाऱ्यांचे हात, पाय, तोंड चिकटपट्टीने बांधले. तर शोरूममधील दोघांना शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने बॅगेत भरण्यास सांगितले. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत त्यांनी संपूर्ण शोरूम खाली केले.

READ ALSO

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

हिऱ्यांचे दागिने भरलेली बॅगे शोरूममध्येच सोडली !
दरोडेखोर दागिने बॅगेत भरून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच एका ग्राहकाने शोरूममध्ये प्रवेश केला. यातील दृश्य बघताच त्याने आरडाओरडा सुरू करत शोरूम बाहेर पळ काढला. आता लोकं जमा होतील, या भीतीने दरोडेखोरांनी दागिन्यांनी भरलेल्या बॅगा घेऊन जाताना आपल्याला कुणी विरोध करू नये यासाटी काचेच्या दरवाजावर गोळीबार केला आणि वाहनातून पलायन केले. परंतू या घाई गडबडीत दरोडेखोरांनी हिऱ्याचे दागिने भरलेली बॅगे मात्र, शोरूममध्येच सोडून दिली. दरम्यान, दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच पोलिसांनी आपली ओळख पटू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जमा होणारे ५ पैकी ४ उपकरणेही दरोडेखोरांनी सोबत नेली.

१५ किलो सोने पोत्यात भरून पसार !
रिलायन्सच्या शोरूममधील जवळपास १५ किलो सोने दरोडेखोरांनी पोत्यात भरले. तसेच जवळपास दीडशे विविध रत्ने पेटीत टाकून पुन्हा गोळीबार करत पसार झाले. १०-१२ किलो सोने व ३-४ कोटींची रत्ने दरोडेखोरांनी लुटली आहेत. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेलींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोर एका स्कॉर्पिओ गाडीतून घटनास्थळी आले होते. दरोडेखोर सोलापूर किंवा कर्नाटकाकडे पळाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
Next Post

धरणगावात 'शास्त्रीय व सुगम संगीत संध्या' आयोजन उत्साहात साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहार निवडणुकीत ना. गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार !

October 8, 2020

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी !

July 27, 2021

‘समजने वाले को इशारा काफी है’ : भाजप नेते चंद्रकांत पाटील

June 21, 2022

पदाचा मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही ; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा !

November 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group