TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : वाळूमाफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला ; शासकीय वाहनाचीही तोडफोड !

एमआयडीसी पोलिसात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या...अंगावर काटा आणणारा संपूर्ण घटनाक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवार, ६ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) गेले होते. त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले. यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जणांनी थेट कासार यांच्यावर हल्ला चढवला. कासार यांच्यावर डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत जखमी कासार यांची विचारपूस केली.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा दाखल !
विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा, गौतम पानपाटील,विठ्ठल पाटील,आकाश युवराज सपकाळे,योगेश उर्फ रितीक दिगंबर कोळी, अमोल छगन कोळी, संदीप ठाकुर,शिवकुमार इंगळे, अक्षय नामदेव सपकाळे (सर्व रा. जळगाव)

जाणून घ्या…अंगावर काटा आणणारा संपूर्ण घटनाक्रम !

उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11.00 वाजता हे तहसीलदार विजय बनसोडे हे वाहन चालक नामे सुरेश महाजन व लक्ष्मण मनोरे यांच्यासोबत शासकीय वाहन क्रमांक (एम. एच. 28 सी. 6421) ने नशिराबादमार्गे भुसावळकडे अवैध वाळु वाहतुक करीत असलेले डंम्परवर कारवाई करण्यासाठी जात होते. यावेळी त्यांना तरसोद फाट्याजवळ त्यांच्या वाहनापुढे एक पिवळ्या रंगाचे (एम. एच. 19 बी.एम.9191) ही ट्रक वाळुने भरलेली भरधाव वेगात जात होती. कासार यांनी लागलीच डंम्परचा पाठलाग सुरु केला. थोड्याच वेळात नशिराबाद हायवे रोडवरील महेंद्र शोरुम जवळ थांबवुन डंम्परला थांबवून चालकास वाळू संदर्भातील रॉयलटीचे कागदपत्राबाबत विचारपुस केली. डंम्परची कागदपत्राची तपासणी करीत असतांना त्याठिकाणी काही लोक हे मोटारसायकल व कारने आले. त्यांनी कासार यांना नाव सांगून त्यांचा परिचय दिला. कासार बोलण्यात गुंतवून ठेवत डंम्पर जळगावच्या दिशेने पळवुन न्यायला सुरुवात केली.

 

टॉमीने मारहाण उपजिल्हाधिकाऱ्यांसह चालकालाही मारहाण !

कासार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत डम्परचा पाठलाग सुरु केला. चालकाने डंम्पर हे तरसोद गावात जाणाऱ्या रस्त्यावर डंम्पर चालु स्थितीत जागीच सोडुन पळुन गेला. यावेळी कासार हे डम्पर चालक हा कुठे गेला?, हे पाहत असतांना रात्रीचे 11.30 वाजेच्या सुमारास 1) विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे 2) गौतम पानपाटील 3) विठ्ठल पाटील 4) आकाश युवराज सपकाळे 5) योगेश उर्फ रिर्तीक दिगंबर कोल्हे (6) अमोल छगन कोळी 7) संदीप ठाकुर 8) शिवकुमार इंगळे 9) अक्षय नामदेव सपकाळे यांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन प्राणघातक हत्यारनिशी कासार यांच्या अंगावर धावुन जात जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लाथाबुक्यांनी रोडावर आडवे पाडुन मारहाण व शिवीगाळ केली. तसेच गौतम पानपाटील याने त्याच्या हातातील लोखंडी टॉमी डोक्यावर मध्यभागी मारली व डावे खांद्यावर, दोन्ही माड्यांवर टॉमीने मारहाण करुन दुखापत केली. तसेच मोबाईलदेखील टॉमीने फोडला. कासार यांना वाचविण्यासाठी चालक लक्ष्मण मनोरे हे आले असता त्यांना देखील टॉमीने हातावर मारहाण करण्यात आली. यावेळी कासार हे जिव वाचविण्यासाठी शासकीय वाहनात बसण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी शासकीय वाहनावर देखील हल्ला करुन तोडफोड केली.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

आरटीओ श्याम लोहींविरुद्ध थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावजवळ अपघात; एक जण जागीच ठार !

January 24, 2022

कुसुंब्यात २ मार्च रोजी २१ तपस्वी वृंदांचे आगमन व स्वागत मिरवणूक !

March 1, 2024

कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा, अदर पूनावालांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

April 16, 2021

धरणगाव : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी ; ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

March 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group