TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : नऊ जणांनी केला तरुणाचा खून ; मृतदेह पुरला निर्जनस्थळी !

धक्कादायक कारण आले समोर ; सात संशयित ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) दारूचे व्यसन, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाकडून सततची होणारी पैशांची मागणी, शिवीगाळ व दहशत या त्रासाला कंटाळून नऊ संशयितांनी संगनमत करून ‘त्या’ युवकाचा खून केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर संशयितांनी युवकाचा मृतदेह एका निर्जनस्थळी खड्यात पुरून ठेवल्याचीही बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी शिताफीने केलेल्या तपासात नऊ संशयितांची नावे समोर आली आहेत. यापैकी सात जणांना अटक केली असून, एक विधिसंघर्षित बालक, तर एक जण फरार आहे.

त्रास सहन न झाल्याने कायमचा काटा काढण्यासाठी रचला कट !
वांजुळे येथील युवक हरिश्चंद्र कचरू शेवरे उर्फ हऱ्या (वय ३६) हा १४ डिसेंबर रोजी हरवल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून काही संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी पोलिसांना कबुली देताना सांगितले की, बांजुळे गावातील हरिश्चंद्र शेबरे हा जबरदस्तीने पैशांची मागणी करायचा, तसेच पैसे न दिल्यास शिवीगाळ व धमकी द्यायचा. त्याचा त्रास सहन न झाल्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.

READ ALSO

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

लाठ्याकाठ्या व हत्यारांनी मारहाण करून केला खून !
यानंतर ठरल्याप्रमाणे छगन गांगोडे याने हरिश्चंद्र शेवरे यास दुचाकीवर बसवून टिटवे गावच्या पुलाजवळ आणले. येथे आधीच येऊन थांबलेल्या अन्य संशयितांनी हरिश्चंद्र शेवरे यास लाठ्याकाठ्या व हत्यारांनी मारहाण करून खून केला, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह वारे ते तळ्याच्या पाड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या खाली एका ओहळाच्या खड्ड्चात पुरले.

सात संशयित ताब्यात, एक फरार, एक संशयित विधीसंघर्षित बालक !
या प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले, तर एक संशयित विधीसंघर्षित असून, दुसरा संशयित फरार आहे. अशाप्रकारे या गुन्ह्यात एकूण नऊ संशयितांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, हरिश्चंद्र शेवरे याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

असा लावला छडा
टिटवे येथे हरिश्चंद्र शेवरे याचे काही तरुणांसोबत भांडण झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती; परंतु त्याबाबत गावात वाच्यता कुठेच होत नव्हती. गावातील कोणीच काही सांगायला तयार नव्हते. मात्र, पोलीस तपासात प्रारंभी एकाचे नाव पुढे आले. नंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. सुरुवातीला संशयितांच्या घरी चौकशी केली असता ते घरी मिळून आले नाही. अखेर पोलिसांनी संशयितांचा मोबाइल क्रमांक शोधून तांत्रिक तपासावरून चार संशयितांना दिव-दमण येथून ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच चौघाही संशयितांनी घटनाक्रम सांगायला सुरुवात केली.

 यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा !
पोलिसांनी सखोल तपासानंतर सात संशयितांना ताब्यात घेतले. तसेच एक संशयित विधिसंघर्षित असून, एकजण फरार आहे. पोलिसांनी अपहरण व खूनप्रकरणी छगन पुंडलिक गांगोडे (२७, रा. वारे, ता. दिंडोरी), दीपक पुंडलिक हिंडे (१९, रा. तळ्याचा पाडा), मनोहर ऊर्फ मनु अंबादास गांगोडे (२४ रा. वारे), अशोक कडू नवले (३६ रा. टिटवे), पंडित साहेबराव शेळके, (रा. टिटवे,) देवीदास वसंत गांगोडे, (रा. भोकरपाडा), खंडू ऊर्फ महेंद्र देविदास गांगोडे (३३ रा. वारे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 डिसेंबर 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलं पळविणारा समजून धरणगावात एकाला पकडले ; अफवांवर विश्वास ठेऊ नये, पोलिसांचे आवाहन !

September 28, 2022

सुनील महाजन यांचा पाय खोलात ; बँक खात्यासह उमेदवारी अर्जावर एकच मोबाईल क्रमांक !

December 12, 2024

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

September 23, 2020

मेहुणबारे गुटखा प्रकरण : एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली

October 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group