धरणगाव (प्रतिनिधी) दरवर्षी ७ एप्रिलला जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जगावर आज कोरोनाचे संकट आले आहे. अनेक देशात कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, नगरसेवक विलास महाजन, भानुदास विसावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील बन्सी, बाळासाहेब जाधव, योगेश वाघ, काँग्रेसचे रामचंद्र माळी, विकास लांबोळे, नंदलाल महाजन, गोरख देशमुख, विलास वाघ, बाळा विसावे, बबलू मराठे, अविनाश चौधरी, डॉ. निलेश जगताप, जयश्री महाले, कांचन पडोळ, बिंदू पावरा, रुग्णवाहिका चालक अविनाश चौधरी, सुरक्षा रक्षक नामदेव मराठे, सागर दुर्गे, राजु कवरोशिया, वार्डबॉय शुभम माळी, भागवत चौधरी, जीतूभाऊ न्हयादे, सुरेश महाजन, अहेमद पठाण, राहुल रोकडे, दिपक पाटील, विलास माळी, महेंद्र चौधरी, अरवींद चौधरी आदी उपस्थित होते.