TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल !

मतदार विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही - गुलाबराव पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
October 24, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सुमारे २० हजाराच्यावर कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेनेची मुलुख मैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन ना. पाटील यांची भव्य रॅली सुरू झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीत गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. सभेत गुलाबराव पाटील यांनी शेरो-शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केली. “जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे माझ्यासाठी टॉनिक आहे,” असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले आणि विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आगामी निवडणुकीत कोणताही निष्काळजीपणा न करता १ महिना मेहनत घ्यावी. तुमच्यासह व लाडक्या बहिणीच्या मेहनतीने व साथीने विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही याची १०० % खात्री आहे. येत्या २७ तारखेला श्री क्षेत्र पद्मालय येथे प्रचार नारळ फोडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज दाखल करून आल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, गुलाबभाऊ हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असून देखील पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अर्ज भरतांना दिसून आल्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा आशावाद ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आज धरणगावात अक्षरश: जनसागर उसळल्याने शहरात भव्य यातेचे स्वरूप होते. मतदारसंघातील विविध गावांमधून हजारोंच्या संख्येने समर्थकांनी वाजत-गाजत – नाचत धरणगाव गाठले.अनेक गावांमधील हजारो तरुणानी घोषणांनी जोरदार जयघोष करत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून धरणगाव गाठून रॅली व सभेला हजेरी लावली.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सर्वात पहिल्यांदा ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगावचे दैवत मानल्या जाणाऱ्या श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या विजयासाठी साकडे घातले. यानंतर एका उघड्या जीपवरून पालकमंत्र्यांची भव्य रॅली काढण्यात आली. बालाजी मंदिरापासून धरणी, धरणी बाजार, कोट बाजार, पी. आर. हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही रॅली आली. संपूर्ण धरणगाव शहर हे भगवामय झाले होते. उघड्या जीपवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चंदू अण्णा सोनवणे, खा.स्मिताताई वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, अनिल अडकमोल, शिवसेना, रॉ.कॉ. व भाजपाचे तालुकाध्यक्ष यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी विराजमान होते. यात सहभागी झालेल्या तरूणाईच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेसाठी दिनांक २४ रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने आपला अर्ज दाखल केला.

याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन म्हणाले व की, ही सभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नसून विजयी सभा आहे, गुलाबभाऊंनी पाच वर्षे जनतेची सेवा केली असून त्याना प्रचंड मताधिक्यानी निवडून आण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. पाटील सर यांनी केले. आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना, भाजपा व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी -शे कडो गावातून हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यकर्ते, या रॅलीत महिलांची उपस्थिती देखील लक्षनिय होती . रॅलीत उपस्थित नागरिकांसाठी ठिक – ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: gulabrao patilvidhansabha nivdbuk

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर ; गुलाबराव देवकर, रोहिणीताई खडसेंसह दिलीप खोडपेंना संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : दोन ट्रकची परस्पर विक्री ; जळगावात आरटीओ एजंटसह एकाविरुद्ध गुन्हा !

April 12, 2023

‘देहूचे शिळा मंदिर हे भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर…’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

June 14, 2022

वरणगाव नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलास मिळाले वाहन

November 16, 2021

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार : पालकमंत्री ना. पाटील

August 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group