TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगावात शिवसेनेचा मेळावा उत्साहात ; आगामी निवडणुकांसाठी फुंकले रणशिंग

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयोेजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील दिला. आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. तर गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत धरणगाव येथील श्रीजी जिनींग परिसरात शनिवारी सायंकाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी धरणगाव तालुक्यातील संघटना बांधणी, झालेली विकास कामे व बुथरचना बाबत विस्तृत माहिती विषद केली. तसेच सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर यांनीकेले तर आभार उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी मानले.

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत , वक्ते गजानन चव्हाण, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मुंबईचे निरीक्षक प्रशांत सातपुते, सुमित बने, संतोष चांदे, शांताराम बने, जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जीवन आप्पा बयास, भरत महाजन, अभिजित पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील, उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, उपतालुका प्रमुख मोतीअप्पा पाटील, राजेंद्र ठाकरे, डी. ओ. पाटील, मुकुंदराव नन्नवरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, तत्कालीन नगराध्यक्ष निलेश चौधरी, महिला पदाधिकारी माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, तालुका प्रमुख जनाआक्का पाटील, रत्नाबाई धनगर, अंजली विसावे, हेमांगी अग्निहोत्री, धिरेंद्र पुर्भे, रविंद्र चव्हाण सर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अक्षय मुथा, किशोर पाटील, सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही पक्षाला यश मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी अतिशय भावपूर्ण असे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फक्त शिवसेनाप्रमुख नसून ते एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे व संवेदनशील मुख्यमंत्री कसे आहेत याची उदाहरणे देत त्यांनी विविध लोकल्याणकारी योजनांना लागू करण्याची माहिती दिली तेव्हा अनेकांना गहिवरून आले. उध्दवजी हे मातृहृदयी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव तालुक्यात शिवसेनेची अतिशय मजबूत स्थिती आहे. जिल्ह्यातील पहिला आमदार येथूनच मिळाला असून सुमारे २५ वर्षांपासून येथे शिवसेनेचा आमदार आहे. येथूनच १९९६ साली जिल्ह्यातील पहिला नगराध्यक्ष निवडून देण्याचा बहुमान मिळाला आहे. आजही तालुक्यातील जास्तीत जास्त सरपंच, पंचायत समिती आदींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आज जिल्ह्यात शिवसेनेचे ५ आमदार व ५ पंचायत समिती सभापती असून झेडपीचे १५ सदस्य आहेत. आगामी काळात पूर्ण शक्ती पणाला लाऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकावणे अशक्य नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर याप्रसंगी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करून त्यांनी देवांना सुध्दा पक्षीय राजकारणात वाटून घेतल्याचा टोला मारला.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. या निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहण्याची गरज आहे. शिवसेनेने आजवर आपण सर्वांना भरपूर दिले असून आता आपण पक्षाला देण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी खासदार यांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान केले असतांनाही त्यांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याबद्दल घणाघाती टीका केली. खासदारांनी केलेल्या दगाफटक्याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. तर शिवसेनेच्या ध्येयधोरणांची माहिती आणि विशेष करून राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. तर प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावल्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. शेत पाणंद रस्त्यांमुळे शेतकर्‍यांचे आपल्याला आशीर्वाद लाभले आहेत. जि.प. सुरक्षा भिंती अनेक योजनांच्या यशस्वी कार्यान्वयनातून जिल्ह्यात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. यात मुस्लीम समाज सुध्दा या विकासाभिमुख वाटचालीत आपल्या सोबत असून आपण धरणगावातून मुस्लीम कार्यकर्त्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणल्याचे प्रतिपादन ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी त्यांनी सलीम पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर आगामी निवडणुकांमध्ये काही गद्दार हे विंचवाप्रमाणे काम करत असून त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नसल्याचा इशारा देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिला. शिवसैनिकांनी एकसंघ राहून पक्षाचा प्रचार-प्रसार करतांनाच आपला कुणी अपप्रचार करत असेल तर त्यांना जोरदार उत्तर द्या असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर यांनी केले तर आभार उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

सरत्या महिन्यातही उन्हाचा फटका ; जळगावात उष्माघातामुळे एकाने गमावला जीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी मागितली ९ हजारांची लाच ; सापळा रचून मुख्याध्यापिकेसह पर्यवेक्षिकेला अटक !

June 18, 2023

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

December 18, 2021

..तर भाजपचे ७ मंत्री आणि १५ आमदार-खासदार तुरुंगात जातील ; राऊतांच्या सुटकेनंतर खळबळजनक दावा !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group