धरणगाव (प्रतिनिधी) शहरात शिवसेनेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेस आज दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण यशस्वीपणे पार पडले. शिवसेनेमार्फत भावसार समाज पंचमढी या ठिकाणी व मरी माता मंदिर तसेच बजरंग चौक या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
एकाच ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत असल्याने लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी जातीने लक्ष घालून संपूर्ण धरणगाव परिसरात टप्प्याटप्प्याने शिवसेनेमार्फत लसीकरणाची संकल्पना वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील व डॉ. मयुर जैन यांच्या समोर सादर केले. या अभियानाचे उद्घाटन लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. आज ही संकल्पना यशस्वीपणे पार पडत आहे. संपूर्ण शहरात शिवसैनिकतर्फे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ७००० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीम राबवण्यासाठी डॉ. किरण पाटील, व डॉ. मयुर जैन, डॉ. सोनवणे, टि एम ओ यांच्या संपूर्ण टीम व त्यांना मदत करत असणारे शिवसेनेचे संपूर्ण शिवसैनिक पदाधिकारी नोंदणी अभियान राबवत आहेत.
या अभियानाची सुरुवात माळी समाज मढी व मोरवाडी कासार गल्ली येथून सुरू झाली. लसीकरण मोहिमेत शिवसेना शहर शाखा, युवासेना विद्यार्थी सेना, नगरसेवक शिवसैनिक नागरिकांचे रजिस्ट्रेशन प्रसनल कोड उपलब्ध करून व्हेरिफाय करण्यासाठी दोन-तीन दिवस अगोदर पासून टोकन देऊन नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण मोहिमेस सहकार्य करत आहेत. यावेळी पाटील समाज पंच मंडळ, बजरंग चौक या ठिकाणी सोनार सिस्टर व बारेला सिस्टर यांनी लसीकरण केले. डाटा एन्ट्री दिनेश बडगुजर, आर के देशमुख, सागर दुर्गे, गणेश कुंभार, क्रोवर्ड कंट्रोल म्हणून महेंद्र माळी यांनी काम पाहिले. भावसार समाज मढी या ठिकाणी लसीकरण मोरावकर सिस्टर्स तर डाटा एन्ट्री पुनीत थोरात, उमेश येवले, मिस्टर जोशी, क्रोवड मॅनेजमेंट अविनाश चौधरी यांनी काम पाहिले. मरीमाता मंदिर या ठिकाणी लसीकरण भदाणे सिस्टर डाटा एन्ट्री भूषण पालीवाल यांनी काम पाहिले.
यावेळी शिवसेना शहर शाखेतर्फे प्रत्येक नागरिकाला चहा-नाश्ताची सोय करून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिस्तीने लसीकरण करण्यात आले. नागरिकांना चहा नाष्टाची सोय करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
लसीकरण यशस्वीतेसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, शिवसेना गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, नगरसेविका उज्वला पारेराव, संजय चौधरी, शहर संघटक धीरेंद्र पुरभे, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश भास्कर, महाजन कमलेश बोरसे, बुट्या पाटील, दिपक पाटील, राहुल रोकडे, महेंद्र चौधरी, अरविंद चौधरी, गोलु चौधरी, सागर ठाकरे, चदुं भावसार, किशोर पैलवान, रमेश महिपत चौधरी, सिद्धार्थ पारेराव, अनिल फराटे, सागर पाटील, आदींनी परिश्रम घेतले. पोलीस व होमगार्ड बंधु यांचे मोलाचे सहकार्य लाभले.