TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : क्रिकेट बुकी बोमाच्या ‘बर्थ डे’ पार्टीत नाचल्या अर्धनग्न परदेशी तरुणी, नोटांचा अक्षरशः पाऊस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) शनिवारी कळमना पोलीस ठाण्यांतर्गत एका अनधिकृत पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. क्रिकेट बुकी आशिष कुकडे उर्फ बोमा याने आयोजित केलेल्या या पार्टीत पोलिसांनी एक कोटींच्या मालासह २८ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांच्या या कारवाईनंतर अवघ्या २४ तासांनंतर ग्रामीण भागात पुन्हा पार्टी देऊन बुकीने पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिल्याचे चित्र आहे.

शहरातील बर्थ डे पार्टीवर शनिवारी पोलिसांनी धाड टाकल्यानंतर क्रिकेट बुकी बोमाने रविवारी रात्री ग्रामीण भागातील एका बड्या हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करून जल्लोषात बर्थ डे साजरा करत यंत्रणेला एकप्रकारे आव्हान दिले. धाडी टाकल्याच्या २४ तासांनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हॉटेलमध्ये बोमाने वाढदिवसाची भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला शहरातील श्रीमंत व्यक्ती आणि सहकारी बुकींनी हजेरी लावली होती. पार्टीची माहिती मिळताच ३० ते ३५ पोलीस अधिकाऱ्यांनी हॉटेल गाठले, पण कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

कळमना पोलीस ठाण्यांतर्गत चिखली चौकाजवळ रिवाज लॉन येथे शनिवार, २२ जुलै रोजी मध्यरात्री क्रिकेट बुकी आशिष कुबडे उर्फ बोमा (रा. इतवारी, नागपूर) याने त्याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शहरातील नामांकित क्रिकेट बुकींना बोलाविण्यात आले होते. या पार्टीत हुक्का, दारू आणि जुगार खेळण्याची व्यवस्था केली होती. रात्री उशिरा पोलीस उपायुक्त (गुन्हे) मुमक्का सुदर्शन व परिमंडळ क्रमांक ५ चे पोलीस उपायुक्त श्रावण दत्त यांना माहिती मिळताच त्यांनी लॉनवर धाड टाकली आणि २८ बुकींना ताब्यात घेतल्यानंतर कागदोपत्री कारवाई करून त्यांची मुक्तता केली.

या कारवाईनंतर बोमाने शनिवारची बर्थ डे पार्टी रद्द केली, पण त्यानंतर बोमाने छिंदवाडा रोडवरील एका भव्यदिव्य हॉटेलमध्ये रविवारी रात्री बर्थ डे पार्टीची योजना आखली. यासाठी खास निमंत्रित पाहुण्यांना बोलाविण्यात आले. यासाठी मुंबई आणि कोलकाता येथून अनेक पाहुणे आले. शहरातील प्रमुख व्यक्तींचीही या पार्टीला उपस्थिती होती. या पार्टीतील काही फोटो व्हायरल झाले. यात काही तरुणी अर्धनग्नावस्थेत नाचताना दिसल्या. त्यांना बाहेरून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारच्या धाडीनंतर बोमाने संडे पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा मद्यविक्रीचा परवाना घेऊन सावधगिरीची पावले उचलली. त्यामुळे कार्यक्रमात सर्वजण दारू पिऊन नाचगाण्यात धुंद असल्याचे चित्र होते. कळमना येथील रिवाज लॉन येथील धाडीच्या कारवाईनंतर बोमाने नव्या जोमाने २४ तासांच्या आत पुन्हा बर्थ डे पार्टी आयोजित केल्याने त्याच्या धाडसाची चर्चा सुरू आहे. कधीकाळी दोन वेळच्या जेवणाची सोय नसलेला बोमा आज अब्जावधीमध्ये खेळत आहे.

नागपूर ग्रामीण पोलिसांना या पार्टीची सूचना मिळताच ३० ते ३५ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी त्वरेने पार्टीचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच परदेशी अर्धनग्नावस्थेत नृत्य करणाऱ्या तरुणी थांबल्या, पण कोणीतरी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आल्या पावली पोलीस ताफा परत गेला, पण अधिकृतरीत्या याची पुष्टी झालेली नाही. रविवारच्या पार्टीत ५० लाखांहून अधिक खर्च झाल्याची चर्चा आहे. याबाबतचे वृत्त आज विविध माध्यमांनी दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

धक्कादायक : शेतातील चिखलात पडून शेतमजुराचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नातेवाईकांना भेटून घरी परत जायला निघाले, क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; पती-पत्नीचा अपघाती मृत्यू !

June 24, 2023

जरंडेश्वर प्रकरणी सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस

July 10, 2021

‘चोरों को सारे नजर आते है चोर’ ; एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

February 20, 2022

मंगळग्रह मंदिर देवस्थानमार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात “वॉटर बॉटल” वाटप !

August 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group