TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! बालविवाहसह अनेकांनी अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात अल्पवयीन मुलीचा बालविवाहसह तिचा अनेकांनी अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ’ असं म्हणत बापानेही छळ केला. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पती, वडील, चुलते, भाऊ, नंणद यांच्यासह जेवायला देतो म्हणून बलात्कार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील व माझा भाऊ असे सोबत राहायचो. आईचा मी ८ वर्षाची असताना मृत्यू झालेला आहे. माझं ७ वीपर्यंतचे शिक्षण झालं आहे. मी मुलींच्या वसतिगृहात राहत होते. ७वी नंतर वडील मला गावी घेऊन गेले. त्यानंतर लगेच अंदाजे १९ मे २०१८ रोजी मी १३ वर्षाची असताना बळजबरीने लग्न लावून दिलं. माझ्या लग्नाला नणंद सोनाली तसेच माझे वडील, भाऊ तसेच माझा मोठा चुलता, लहान चुलती यांच्यासह ब्राह्मण व इतर काही लोक हजर होते. लग्नानंतर मी, माझी आजेसासु असे अंबाजोगाई येथे राहत होतो. त्यावेळी माझा नवरा दुसऱ्या गावी कामाला जात होता व माझा नवरा अधूनमधुन धारुरवरुन यायचा, तेव्हा आमची जवळीक होत असे. माझा नवरा मला मारहाण देखील करायचा म्हणुन मी १४ जानेवारी २०१९ रोजी रागाच्या भरात माहेरी निघून आले. तेथे वडील व भाऊ यांच्याबरोबर राहु लागले.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

मी माहेरी राहत असताना माझे वडील मला म्हणत असे की, ‘तु तुझा नवरा सोडुन आमच्याकडे का राहायला आलीस? नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ’ असं म्हणून शरीराला वाईट अर्थाने स्पर्श करायचे. मारहाण देखील करत होते म्हणून त्यांना कंटाळुन मी घरातुन निघून गेले. जून २०२१ पासून अंबाजोगाई येथील बसस्टॉप परिसरात वास्तव्यास असते. मी एकटी असल्याचं बघून अंबाजोगाई येथील ज्ञानदीप अँकडमी येथील हरी व ऋषी यांनी १५ दिवसापुर्वी जेवायला देतो असं सांगत आडस रोडला मोकळ्या जागेत नेऊन माझ्यावर बलात्कार केला. आडस रोडच्या डाव्या बाजुला असलेल्या मोकळ्या प्लाटिंगमध्ये १५ दिवसापुर्वी हरी दराडे (रा. गावदंरा, ता. धारूर) व ऋषिकेश दत्तात्रय सांगळे (रा. चाडगाव ता. धारूर) यांनी माझ्यावर बलात्कार केला, अशी हादरवून टाकणारी आपबीती या पीडितेनं तक्रारीत नमूद केली आहे.

या अल्पवयीन मुलीची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, मानवलोक मनस्विनी प्रकल्पाचे बालाजी वाघमारे, शोभा किरवले यांना मिळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांची भेट घेतली. भेटीनंतर नेरकर यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचनेसह तपास करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी ऋषिकेश सांगळे यास ज्ञानदीप अॅकडमी येथून अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
Next Post

एसटी संप सुरूच : प्रशासनाचा अघोरी निर्णय, 'या' आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर तालुक्यात पावसाचा हाहा:कार ; दोघांचा मृत्यू, माजी नगरसेवक बेपत्ता !

July 6, 2023

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021

आठ वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने लगावली बापाच्या कानशिलात !

December 8, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 जानेवारी 2024 !

January 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group