पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील हार्डवेअर दुकान गल्ला फोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्री खुर्द येथील रहिवाशी चेतन विजय मालू (वय-३४) यांचे धरणगाव जळगाव रस्त्यावर हॉटेल शितल समोर सिरॅमिक्स हार्डवेअर नावाचे दुकान आहे. २४ डिसेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मालू यांना दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजले. तर चोरट्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएम ५१६६) ही बेवारसरित्या आढळून आली आहे. दरम्यान, चेतन मालू यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. दिपक पाटील करीत आहे.