जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा कारागृहातून पलायन करण्यापूर्वी ज्या मोबाईलवरुन बोलत होते, त्यातील सीमकार्ड कारागृहात पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग -5 गुरन,81/2020 भादवि.क.307,353,120(ब),224,225 सह आर्म अॅक्ट कलम 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 1) सागर संजय पाटील (वय -23 रा.शिवाजीनगर,पैलाड,अमळनेर), 2) गौरव विजय पाटील (वय -21 रा.तांबापुरा अमळनेर) , 3) सुशिल अशोक मगरे (वय – 32रा.लेलेनगर पहुर कसबे,ता.जामनेर), 4) जगदिश पुंडलिक पाटील (वय – 19 पिंपळकोठा ता.पारोळा), 5)नागेश मुकुंदा पिंगळे (वय – 22 रा.सप्तरंगी कॉलनी,शिरुद्ध नाका,अमळनेर), चेतन उर्फ माया अनिल भालेराव (वय – 22 रा.विवेकानंदनगर,जेलमागे,जळगाव) असे आरोपींचे नावे आहेत.
शहरातील जिल्हा कारागृहातून दि.25/07/2020 रोजी 07:00 वाजेच्या सुमारास जळगाव शहरात जिल्हा कारागृहाचे मुख्य प्रवेशव्दार येथे मुख्य प्रवेश व्दारावर गेट किपर म्हणुन डयुटी असतांना यातील आरोपी सागर पाटील, गौरव पाटील, सुशिल मगरे व जगदिश पाटील यांनी एकत्र येवुन फिर्यादीचे पंडीत दामु गुंडाळे (वय-47 कारागृह रक्षक ) रा.कारागृहवसाहत खोली क्रमांक 6 जिल्हा कारागृहाजवळ जळगाव यांचं कपाळावर डोक्यास गावठी कट्टा लावुन आरोपी गौरव याने फिर्यादीची कॉलर पकडुन खाली पाडुन गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व पॅटच्या खिश्यातील चाव्या काटुन जिल्हा कारागृहाचे मुख्य प्रवेशव्दार उघडुन कारागुहाच्या कायदेशिर रखालीतुन पळुन गेले व आरोपी 4) जगदिश पुंडलिक पाटील (वय – 19 पिंपळकोठा ता.पारोळा) याने गुन्हयात सहभागी होवुन त्यांना पळुन जाण्यासाठी मदत केली.
या आरोपींनी दिले सिमकार्ड
सिमकार्ड बाबत सखोल तपास केला असता नागेश मुकुंदा पिंगळे (वय – 22 रा.सप्तरंगी कॉलनी,शिरुद्ध नाका,अमळनेर) याने अमळनेर हुन आणलेले सिमकार्ड चेतन उर्फ माया अनिल भालेराव (वय-२२रा.विवेकानंदनगर,जेलमागे,जळगाव) यास दिले होते. चेतन उर्फ माया अनिल भालेराव याने सिमकार्ड असलेला पावडर चाइबा जेलचे बाहेरुन जेलचे आतमध्ये फेकले. सदर मोबाईल सिमकार्ड वरुन सदर गुन्हयातील आरोपीतांनी जेलचे बाहेर लोकांशी संपर्क केला होता. त्या अनुषंगाने चेतन उर्फ माया अनिल भालेराव (वय – 22 रा.विवेकानंदनगर,जेलमागे,जळगाव) त्या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग -5 गुरन.81/2020 भादवि.क.307,353,120(ब),224,225 सह आर्म अॅक्ट कलम 3/25गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पथकाने केली कारवाई
सदर गुन्हयातील आरोपीतांनी सबजेलमध्ये मोबाईल वर बोलतांना जे सिमकार्ड वापरले होते. त्याबाबत अधिक तपास करण्याबाबत सुचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी स.फौ.अशोक महाजन, विजयसिंग पाटील,अनिल जाधव, राहुल पाटील, दत्तात्रय बडगुजर, अरुण राजपुत, किरण चौधरी, दर्शन ढाकणे यांचे पथक तयार केले होते.