TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ताणतणाव निवारण्यासाठी खेळ हा उपचार ; अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत राहावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगावमध्ये विभागीय महसूल स्पर्धेचे उदघाटन ; 14 क्रीडा प्रकार खेळले जाणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2024
in क्रीडा, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खेळ हे ताणतणाव कमी करण्यासाठी एक उत्तम उपचार आहे. महसूल सारख्या सतत कार्यमग्न असलेल्या विभागात मानसिक आरोग्य चांगले राखणे हे एक आव्हान असते. त्यासाठी क्रीडा स्पर्धा हे एक उत्तम माध्यम आहे. यात अधिकाधिक महसूल अधिकारी,कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. या स्पर्धेतून नवी ऊर्जा घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावपाटील यांनी केले.

नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुलात उदघाटन करतांना बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल,जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्यासह पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहा वर्षानंतर स्पर्धा होत आहेत. अशा स्पर्धा नियमित झाल्या पाहिजेत असे सांगून सहा वर्षानंतर स्पर्धा होत आहेत, त्या आमच्या जळगाव जिल्ह्यात होतं आहेत. जळगावच्या उन्हात स्पर्धा म्हणजे ‘उत्साहाची सावली ‘ असून ही ऊर्जा आयुष्यभर पुरणारी असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

महसूल सर्व यंत्रणाचा मुख्य कणा
शासनातील महसूल यंत्रणा ही सर्व यंत्रणाच्या समन्वयाचे काम करते. त्यामुळे ती मुख्य कणा आहे. शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असला तरी महसूल कर्मचाऱ्यांना मात्र कोणत्याही आपत्ती मध्ये, कोणतेही उत्सव, महोत्सव वा आंदोलन तिथे महसूल कर्मचारी असतोच त्यामुळे महसूल मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मानसिक समाधान आवश्यक आहे. त्यासाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घेऊन मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवा असा आरोग्यपूर्ण सल्लाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.

आज जळगाव मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विभागीय महसूल आणि सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत. विविध कारणामुळे मागच्या सहा वर्षात या स्पर्धा होत असून विभागात एकूण साडे सहा हजार अधिकारी,कर्मचारी आहेत. त्यातल्या दिड हजार अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. खेळ हा मानसिक संतूलनासाठी गरजेचा असल्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागवार आणि राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यासाठी मान्यता दिल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून तसेच क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली. यावेळी विभागीय स्पर्धासाठी तयार केलेल्या स्मरणीकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे नेटके व बहारदार सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार नाशिक महसूल विभागाचे उपायुक्त रमेश काळे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरु ; ग्राहकांना ऑनलाईन प्रणालीवर मागणी नोंदविण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविडमुळे अनाथ झालेल्यांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 16, 2021

सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही ; के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

February 20, 2022

बीएचआर घोटाळा : नवटके मॅडमांच्या कारवाईने संशयित भेदरले ; ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण !

June 17, 2021

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

March 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group