छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव एसटी महामंडळाच्या बसने एका दुकाचीस्वारास धडक दिल्याने या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.११) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हर्सल गावापुढे कब्रस्तानजवळ झाला. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बस चालकाविरुद्ध हसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब संजय वाघ (१९, रा. चौका, ता. फुलंब्री) असे मृताचे नाव आहे. याबाबत भाऊ कृष्णा बाजीराव वाघ याने दिलेल्या तक्रारीनुसार मृत बाबासाहेब वाघ हा शहारातील एका शोरूममध्ये काम करत होता. शुक्रवारी (दि.११) दिवभर काम करून संध्याकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच २० डीआर ५३४५) गावाकडे घरी परतत असताना फुलंबीकडून औरंगाबादकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने (एमएच २० बीएल १५२२) समोरून बाबासाहेब वाघ यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात बाबासाहेब वाघच्या डोक्याला गंभीर मार लागला. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.