TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात कापूस खरेदीस प्रारंभ, एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नाही : गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सरकार अडचणीत असूनही कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते धरणगाव येथे शासकीय कापूस खरेदीच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.

धरणगाव येथील कृष्णा कॉटन व एस. के. कॉटन जिंनीग प्रेसिंग मिल मध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते तथा पणनेचे संचालक संजय पवार, पंचायत सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, आशिष गुजराथी, शेतकी संघाचे अध्यक्ष पाटील, तहसीलदार देवरे, सहाय्यक उपनिबंधक बारी , गजानन पाटील, मच्छींद्र पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, नगरसेवक पप्पू भावे, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, जीवन बयास, प्रेमराज पाटील, भानुदास विसावे, राहुल पारीख, मूर्तिजा बोहरी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण सर्वजण कोरोनाच्या विशिष्ट परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आहोत. कोरोनामुळे अनेक अडचणी असल्या तरी सरकारने कापूस खरेदी सुरू केली आहे. धरणगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या कापसाला चांगला भाव मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, व कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

दरम्यान, धरणगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आशिष गुजराथी व संजय पवार यांनी आपल्या मनोगतातून शेतकर्‍यांनी कापूस खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. पाटील यांनी केले तर आभार जिनिगचे मालक व नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

यावल-वढोदेजवळ ट्रक-दुचाकीच्या धडकेत युवक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रेडीट कार्ड ऑफरची बतावणी करून अमळनेरच्या तरुणाला साडेसात लाखांत गंडवले !

January 21, 2023

सरकार-शेतकऱ्यांमध्ये आजची बैठक रद्द

December 9, 2020

‘कभी खुशी कभी गम’ ला २० वर्षे पूर्ण ; करण जोहरने शेअर केला लक्षवेधी थ्रोबॅक व्हीडिओ

December 14, 2021

उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक : नाशिक विभागातुन आजपर्यंत ८ लाख ४८ हजार २९९ रुग्ण कोरोनामुक्त

June 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group