धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यानी शनिवार व रविवार असा आठवड्यात दोन दिवस लॉकडाऊन जाहीर केला. पण यात फेरआदेश करण्यात आला तो सर्वांना संभ्रमात टाकणारा व दिशाभूल करणारा असून दुकाने बंद ठेवण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी व भाजप व्यापारी आघाडीच्यावतीने नायब तहसीलदार मोहोड यांना निवेदन देण्यात आले की, मुख्यमंत्र्यानी शनिवार व रविवार असा आठवड्यात दोन दिवस लॉकडाऊन जाहीर केलेला होता तो योग्यच आहे. परंतु त्यानंतर लॉकडाऊन संदर्भात जो फेरआदेश आला तो सर्वांना संभ्रमात टाकणारा व दिशाभूल करणारा आहे. अत्यावश्यक सेवामध्ये नसलेली सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यासाठी अचानक जारी करण्यात आलेला आदेश अतिशय जाचक व अन्यायकारक आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, जनता कर्फ्यू व गुरुवार बंद यामुळे व्यापारी दुकानदार आर्थिक दृष्टया कमजोर झालेला आहे. नाभिक समाजातील व्यावसायिकांची व इतर व्यापाराची तीच अवस्था आहे. यांचे लाइटबील, दुकानाचे भाडे, माणसांचे पगार, बँक कर्जाचे हफ्ते, भरलेले नाहीत तसेच उदरनिर्वाह साठी पैसे नाहीत, घरातील कोणी व्यक्ती आजारी पडल्यास उपचारासाठी पैसे नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने लॉकडाऊन संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि व्यापारी, व्यावसायिकांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, ज्यामुळे ते विवंचनेतुन बाहेर निघतील तसेच स्थानिक स्तरावर आपल्या जुलमी आदेशाचे घटकांकडून पालन व्हावे म्हणून जी आर्थिक दंडात्मक कार्यवाही केली जाते ती करण्यात येऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व भाजपा व्यापारी आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी भाजपचे गटनेते कैलास माळी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, मीडिया प्रमुख टोनी महाजन, अनिल महाजन, भाजप व्यापारी आघाडी शहराध्यक्ष व व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय भाऊ कोठारी, हितेश पटेल, आनंद वाजपेयी, कापड असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाणी, बाळा रायपूरकर, गणेश बिचवे, दिनेश मेहेर, बापू भावसार, प्रमोद जगताप, अनिल महाजन, मनोज सुतारे, मिहीर कापडिया, सराफा असोसिएशनचे जितेंद्र ओस्तवाल, दिपक बागुल, इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अनिल पाटील, दिनेश येवले, दिनेश माळी, मनोज आफ्रे, जनरल स्टोअर्सचे बिपीन अमृतकर, दिनेश चौटे, गौरव कासार, प्रसन्न भावे, यतीन भाटीया, नाभिक दुकानदार दिलीप गायकवाड, गणेश गायकवाड, यांच्यासह इतर दुकानधारक सुदर्शन वाणी, जतीन नगरीया, सचिन कासार, जितेंद्र लोहार, ललित पाटील, प्रफुल महाजन, राजू महाजन, अमोल बडगुजर, हरी शिरसाठ इत्यादी व्यापारी बांधव व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.