पुणे (वृत्तसंस्था) पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात झाला आहे. एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली असून एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झालाय. अपघातातील काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जात आहे. या घटनेमुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याचे दिसत आहे.
यात ट्रकही कारला धडकल्याचे दिसत आहे. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत माहिती मिळालेली नाही. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्पा झाली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.
या अपघातात ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढले आहेत. मागील काही दिवसांतच किमान किरकोळ अपघात धरुन 5 ते 6 अपघात झाले आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तसेच स्थानिक नागरिक देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या पद्धतीने सहकार्य करत आहेत.