TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिन साजरा करून महात्मा फुले हायस्कूलने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक समरसतेत ज्यांनी संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी केली. त्या दाम्पत्याच्या समर्पणाला नजरेआड करणाऱ्या शासन व्यवस्थेला आदर्श उदाहरण यानिमित्ताने महात्मा जोतीराव फुले हायस्कूलने घालून दिला.

इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत भूमिका साकारत दिवसभर शाळेत अध्यापनाचे कार्य केले. प्रशांत पाटील याने मुख्याध्यापकाची भूमिका केली तर यशस्वी पाटील, वैशाली महाजन, रजनी महाजन, गायत्री पाटील, श्वेता पाटील, विशाल पाटील, चेतन महाजन, भूपेंद्र महाजन यांनी शिक्षकाची भूमिका केली तर शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक म्हणून प्रदीप माळी तर शिपायाची भूमिका धनंजय महाजन, भूषण महाजन यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली.

READ ALSO

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी आय. आर महाजन ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस. के महाजन, एच ओ. माळी होते. शाळेतील विद्यार्थी व इयत्ता दहावीतील विद्यार्थी शिक्षक यांनी अध्यापन करतांना आलेले अनुभव कथन केले. यशस्वी पाटील ,शिवम पाटील, प्रशांत पाटील यांनी शिक्षकाची भूमिका करीत असताना आलेले अनुभव कथन करताना ते म्हणाले की, शिक्षक अध्यापन करत असताना बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळ करतात पण आज आम्ही अध्यापन करत होतो. काही विद्यार्थी गोंधळ करण्याचा प्रयत्न करत होते तर अध्यापनात किती अडचणी येतात ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले व अनुभव घेतला. आज आम्हाला शिक्षक होण्याची एक चांगली संधी महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने शाळेतील शिक्षकांनी उपलब्ध करून दिली व आमची सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.

अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले. महात्मा फुले स्मृतीदिन शाळेत दरवर्षी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. महात्मा फुले यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थी शिवम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल पाटील यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
Next Post

कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय ; ठाण्यातील वृद्धाश्रमात ६७ जणांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.जयश्री साळुंके यांची निवड

September 16, 2020

शिवविचार : इतिहास, वर्तमान व भविष्य आहेत – प्रा.डॉ. विनोद बाबर

September 13, 2024

जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई !

July 20, 2024

नुसती पदे मिरवू नका, तर जबाबदारी स्वीकारा ; ना. गुलाबराव पाटलांचे युवासैनिकांना आवाहन

August 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group