जळगाव (प्रतिनिधी) सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिव कॉलनी जळगाव येथे शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाणे तसेच माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांचेऔक्षण केले. विद्यार्थी आणि पालक यांच्या पर्यंत शाळेतर्फे दिला जाणारा मोफत सुविधा पोहचाव्या यासाठी अडकमोल व रेखा चव्हाण यांच्यातर्फे मोफत सुविधा छत्री तयार करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सर्व वर्गशिक्षकांनी मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली. दोन वर्षा कोरोना काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर आधारित विशेष वर्ग घेतले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघेल.