TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) शेतकऱ्याच्या विहिरीवर शेती पंपाला विद्युत कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या बेलकुंड (ता. औसा) उपकेंद्रातील एका तंत्रज्ञाला (वर्ग ३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.१८) दुपारी रंगेहाथ पकडल्याची घटना औसा शहराजवळील तुळजापूर टी पॉईंटजवळ घडली.

औसा येथील एका शेतकऱ्याला त्यांच्या विहिरीवर विद्युत पंप बसविण्यासाठी महावितरणकडून कनेक्शन हवे होते. यासाठी शेतकऱ्याने आरोपी सतीश उत्तमराव कांबळे (वय ३८, महावितरण तंत्रज्ञ, बेलकुंड शाखा, ता. औसा, रा. हंगरगा, ता. निलंगा, जि. लातूर) याच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केली. कनेक्शन देण्यासाठी शेतकऱ्याने सतीश कांबळे याला १ डिसेंबर २०२३ रोजी फोन पे द्वारे १३ हजार रुपये लाच म्हणून पाठविले. त्यानंतर ६ डिसेंबर २०२३ रोजीही फोन पे द्वारेच आणखी २ हजार रुपये पाठविले. सुमारे १५ हजार रुपये लाच घेऊनही सतीश कांबळे याने शेतकऱ्याला विद्युत कनेक्शन दिले नाही. यामुळे पुन्हा सदर शेतकऱ्याने विद्युत कनेक्शन देण्याची विनंती सतीश कांबळे याच्याकडे केली. त्यावेळी कांबळे याने सदर शेतकऱ्याला पुन्हा ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही गोष्ट शेतकऱ्याला खटकली. त्याने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे शेतकऱ्याने मान्य केले. ते दोन हजार रुपये स्वीकारण्यास सतीश कांबळे हा औसा शहराजवळील तुळजापूर टी-पॉईंटजवळ आला. त्याने शेतकऱ्याकडून एका हॉटेलमध्ये दोन हजार रुपयांची लाच शनिवारी (दि.१८) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास स्वीकारली. लाच स्वीकारताच सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी सतीश कांबळे याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपी सतीश कांबळे याच्या विरोधात औसा पोलीस ठाण्यात कलम ७,७ अ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास औसा पोलीस करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल फारूक दामटे, भीमराव आलुरे, श्याम गिरी, शिवशंकर कच्छवे, कॉन्स्टेबल संदीप जाधव, मंगेश कोंडरे, दीपक कलवले, गजानन जाधव, संतोष क्षीरसागर यांनी ही कामगिरी बजावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: carptionLatur

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

भारतीय जैन संघटनेतर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : १७ वर्षीय मुलाचा १३ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मुलगी प्रेग्नंट

January 13, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार लागले कामाला; सुप्रिया सुळेंनी केले फेसबुक लाईव्ह

November 10, 2020

जळगावात माथेफिरुंनी दुचाकी जाळल्या ; काही उपद्रवी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

May 13, 2022

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group