धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील हॉटेल योगिता जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील कल्याणे होळ येथील रहिवासी छोटू आधार पाटील (वय ४७) हे आज सायंकाळी तहसील कार्यालयातील आपले काम आटपून घरी परत जात होते. हॉटेल योगिता जवळ झालेल्या अपघातात त्यांच्या मेंदूला जबर मार लागला या अपघातात ते जागीच ठार झाले. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला. छोटू आधार पाटील यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वडील असा परिवार आहे.