TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात !

कथक नृत्याच्या जुगलबंदीसह फ्युजन बँडव्दारे स्वरांची झाली रूजवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कथक नृत्यातील बनारस घराण्याची परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली. तसेच अभिजात संगीताचा आणि पाश्चात्त्य संगीताचा संगम असलेल्या फ्युजन बँड ने स्वरांची रूजवात करीत रसिकांकडून कलावंतांनी दाद मिळवली.

भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ची सुरवात झाली. छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात होणाऱ्या दीपप्रज्वलनाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे विश्वस्त डाॕ. सुभाष चौधरी, जाई काजळचे राजेश गाडगीळ, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, दिपक चांदोरकर, दीपीका चांदोरकर, वेगा केमिकल्स चे भालचंद्र पाटील, अनदान देशमुख, आरजे टिया, अतुल्य भारतच्या सहाय्यक संचालक स्नेहल पाटील उपस्थित होते.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.

अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाच्या एकवीस आवर्तने स्वराभिषेकाची! यातील प्रथम सत्रात कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड चे सादरीकरण केले. मॅसिव अटॅक कलेक्टिव्ह या बँड ने सुरवातीला ताल तिनताल मध्ये तबला, ड्रम आणि पर्कशनवरती राग किरवाणीमध्ये सादरीकरण केले. त्यानंतर राग कौशी कानडा मधील एक तराणा ताल एकताल मध्ये गायन, सारंगी आणि की बोर्ड यांच्या बरोबरीने सादर झाला. तराणा नंतर पं. जसराज जी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला हवेली संगीत हा गायनाचा प्रकार या बँड मध्ये वेगळ्या प्रकारे सादर झाला. यानंतर राग हंसध्वनी मध्ये एक गाणं सर्वांनी मिळून प्रस्तुत केले. आणि मृगनयनी या पं जसराज जी यांनी गायलेल्या रचनेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.

दमदार कथक नृत्याची मेजवानी
बालगंधर्व संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध सारंगी वादक पं भवानी प्रसाद मिश्रा ह्यांचे नातू व सुप्रसिद्ध सतार वादक पं अमरनाथ मिश्रा ह्यांचे पुत्र सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची प्रस्तुती केली. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान यांनी केली. कथक नृत्यातील बनारस घराण्याच्यी वैशिष्ट्ये त्यांनी नृत्यातून ठळकपणे दाखवत रसिकांची दाद मिळवली. “INDIA’S BEST JUDWAAH” हा उपाधी मिळवणाऱ्या सौरव गौरव ह्यांनी त्यांच्या सादरीकरणाची सुरवात राग अहिर भैरव आणि ताल रुपक मधे बांधलेली “डमरु पानी,शूल पानी,हे नटराजन नमो नमः ” ह्या दमदार शिवस्तुती ने केली.त्यानंतर ताल त्रितालात गुरु पं रविशंकर मिश्रा ह्यांच्याकडून शिकलेल्या बनारस घराण्याच्या प्राचीन बंदीशी,तोडे तुकडे,परन,तसेच काका (मौसाजी ) पं बिरजू महाराजांकडून शिकलेल्या बंदीशी प्रस्तुत केल्या. ताल त्रिताला नंतर राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाची प्रचिती देणारी बंदीश “क्रृष्णप्रिया” वर केलेल्या भावप्रदर्शनाने प्रेक्षकांना मोहित केले.. ह्या दमदार कथक नृत्याची सांगता सौरव गौरव ह्यांनी “आनंद तांडव ” ह्या नृत्याने करुन रसिकांची वाहवा मिळवली. गुरूवंदना चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले.

आज अनुभवा शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनासह चित्रवेणू

द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

अमळनेर : मायलेकीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाची ४ तासांची बैठक संपली ; चिन्हावर आता सोमवारी होणार निर्णय !

October 8, 2022

महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सन्मान

September 28, 2021

मंत्रालयासह रेल्वेत नौकरीचे आमिष, जळगावात परिवाराला घातला २२ लाखांचा गंडा !

March 28, 2023

‘पेगॅसस’चे खरे बाप आपल्याच देशात आहेत, त्यांना शोधा : शिवसेना

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group