TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाऊबीज सोहळ्याच्या तारखेत बदल होऊ शकतो पण या भावाच्या निस्वार्थ प्रेमात कधीच बदल होणार नाही – आमदार मंगेश चव्हाण

गेल्या ५ वर्षांची परंपरा असलेला आशा - अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविकांच्या सन्मानार्थ भाऊबीज सोहळा चाळीसगाव येथे उत्साहात संपन्न.

vijay waghmare by vijay waghmare
April 4, 2025
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) दरवर्षी तालुक्यातील हजारो आशा अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात त्या आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन तर्फे आयोजित केला जाणारा भाऊबीज सोहळा अखेर मराठी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात उत्साहात संपन्न झाला. तालुकाभरातून उपस्थित असलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या या रक्ताच्या नाही पण दरवर्षी माहेरपण साजरे करणाऱ्या लाडक्या भावाचे औक्षण करत आशिर्वाद दिले. आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील सर्व बहिणींना साडी भेट देत त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्ती केली. . राज्य शासनाने २०२४ पासून लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची योजना सुरु केली मात्र त्याच्या ४ वर्ष अगोदरच आमदार मंगेश चव्हाण यांनी १५०० हून अधिक आशा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी स्वखर्चाने सुरु केलेल्या या भाऊबीज माहेरपण सोहळ्याचे राज्यभरात एक आदर्श पॅटर्नचे म्हणून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

अतिशय अल्प मानधनात कर्तव्य बजावणाऱ्या चाळीसगाव शहर व तालुक्यातील जवळपास १५०० आशा – अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सन्मानार्थ त्यांचा भाऊ या नात्याने सन २०२० पासून आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून या सेविकांना साडी भेट देऊन त्यांचे माहेरपण साजरे केले जाते तसेच त्यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने २५ हजारांचा मामाचा आहेर देखील दिला जातो. गेल्या ३ महिन्यात झालेल्या १३ विवाहांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे ३ लाख २५ हजारांचा मामाचा आहेर आजच्या सोहळ्यात सुपूर्द करण्यात आला. आतापर्यंत तालुक्यातील १०४ आशा – अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजारांप्रमाणे २६ लाखांची मदत देण्यात आली आहे.

READ ALSO

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

दरवर्षी दिवाळी नंतर १ जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी विधानसभा निवडणूक, अधिवेशन आदी कामांमुळे ३ महिने उशिरा आयोजित करण्यात आला. त्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित सर्व बहिणींची माफी मागत जरी काही कारणामुळे भाऊबीज सोहळ्याच्या तारखेत बदल झाला तरी ज्या भावनेने व आपुलकीने हा सोहळा मी आयोजित करतो त्यात जरासाही बदल होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच आशा अंगणवाडी ताई या स्तनदा मातांपासून ते लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात. मी तुम्हाला बहिण मानले आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हीदेखील माझी जबाबदारी असून लवकरच तालुक्यातील सर्व आशा अंगणवाडी ताई यांच्यासाठी संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केली जाईल असे त्यांनी जाहीर केले यासोबतच प्रत्येकाला आपल्या मुलांचे लग्न मंगल कार्यालयात, चाळीसगाव शहरात व्हावे अशी इच्छा असते मात्र परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही त्यासाठी आशा अंगणवाडी ताईंच्या मुला – मुलींच्या लग्नासाठी येणारा मंगल कार्यालयाचा २५ ते ३० हजाराचा खर्च वाचावा म्हणून चाळीसगाव शहरालजवळ खडकी बु येथील ४ ते ५ हजार रुपयात लग्नासाठी मंगल कार्यालय शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार साहेबरावजी घोडे, पोपट तात्या भोळे, देवयानीताई ठाकरे, पाचोरा येथील मधूभाऊ काटे, अमोल नाना पाटील, पारोळा येथील गोविंद आबा शिरुडे, अतुलदादा पवार, के बी दादा साळुंखे, धर्मा आबा वाघ, मच्छिंद्रभाऊ राठोड, वनिताताई विश्वास पाटील, यु डी माळी सर, प्रा. सुनील निकम, नितीन भाऊ पाटील, शेषराव बापू पाटील, संजय तात्या पाटील, धनंजयअप्पा मांडोळे, संगीताताई गवळी, सुलभाताई पवार, भाऊसाहेब तात्या जाधव, रवी आबा पाटील, सुभाष दादा पाटील, आशालाताई विश्वास चव्हाण, निलेश महाराज राजपूत, विश्वास भाऊ चव्हाण, आनंदजी खरात, प्रा.साधनाताई निकम, मोहिनीताई गायकवाड, मनिषाताई पगार, वैशालीताई सोमसिंग राजपूत, विजयाताई भिकन पवार, अलकनंदाताई भवर, रिजवानाताई खान, भैय्यासाहेब आनंदराव पाटील, कपिलदादा पाटील, साहेबराव राठोड, प्रभाकरभाऊ जाधव, बाळासाहेब राऊत, भावेश कोठावदे, प्रभाकरभाऊ चौधरी, निलेश महाराज राजपूत, रवींद्र भावडूदादा पाटील, शैलेंद्र पाटील सर, नवलदादा पवार, प्रदीपदादा पाटील, राहुलदादा पाटील यांच्यासह शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या मनोगतात बोलताना आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, एक भाऊ म्हणून मी नेहमी माझ्या बहिणींच्या सुख-दुःखात सहभागी असतो. या नात्याची जाणीव ठेवत, गेल्या चार वर्षांत मी १०४ भाचींच्या लग्नात मामाचा आहेर म्हणून २५,०००/- प्रमाणे २६ लाख रुपये आहेर दिला आहे. आपल्या मागच्या महायुती सरकारच्या काळात भरघोस अशी मानधन वाढ करण्यात आली यासोबतच अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाख सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी पुन्हा आमदार झालो आणि राज्यात देखील आपले महायुतीचे सरकार आले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रम अंतर्गत सरकार आल्यानंतर चाळीसगाव तालुक्यात ५० हून अधिक अंगणवाडी सेविका / मदतनीस यांची भरती करण्यात आली व या १ एप्रिल पासून त्या जॉईन देखील झाल्या असून या सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या परिवारात स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी साहेबराव घोडे, देवयानीताई ठाकरे, पोपट तात्या भोळे, के बी दादा साळुंखे, संजय तात्या पाटील, प्रा,सुनील निकम यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक संगीता गावली यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रदीप देसले यांनी पार पाडली तर आभार एड.सुलभा पवार यांनी मानले. सोहळ्याच्या सुरुवातीला नुकत्याच कन्नड येथे झालेल्या अपघातातील पातोंडा येथील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपा, शिवनेरी फाउंडेशन पदाधिकारी, अंत्योदय जनसेवा कार्यालय येथील जनसेवक यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chalisgaonmangesh chavhan

Related Posts

गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तश्रृंगी देवीचे घेतले दर्शन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी आणि त्याच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

June 7, 2022

किरणकुमार बकालेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; बोदवड सकल मराठा समाजाचे निवेदन !

September 15, 2022

जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५३ हजार १३९ तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४२७

December 9, 2020

केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवतेय : शिवसेना

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group