TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव तालुक्यातील ‘त्या’ बालिकेचा निर्घृण खून करणारा अटकेत ; संपूर्ण घटनाक्रम वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

आरोपीने एक महिन्यापूर्वीही केली होती पिडीतेची टिंगलटवाळी ; जळगाव एलसीबीकडून गुन्ह्याची उकल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2023
in गुन्हे, जळगाव, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा १९ वर्षीय नराधमाने निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जळगाव एलसीबीने गुन्ह्याची उकल केली असून आरोपीला तपासकमी भडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण !
भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ३० जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू असतानाच १ ऑगस्टला या अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेत कडबा कुट्टीखाली आढळून आला होता. नरबळी की अत्याचाराच्या प्रयत्नातून घडलेला प्रकार याबाबत गावात विविध चर्चा सुरु होत्या. तसेच या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल करा व सशयित आरोपींचा शोध घेऊन आरोपींना तत्काळ अटक करा, बालहत्येला न्याय द्या, या मागणीसाठी गोंडगाव येथील बालिकेच्या आईसह २५० ते ३०० ग्रामस्थांनी आक्रोश करत बुधवारी ठिय्या आंदोलन केले होते.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

खाक्या दाखविताच पोपटासारखा बोलू लागला !
संशयित स्वप्नील उर्फ सोन्याला ताब्यात घेतल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. घटनेच्या दिवशी आपण मित्रांसोबत स्वतःचा वाढदिवस साजरा करत असल्याचे सांगत होता. परंतू आरोपीने एक महिन्यापूर्वीही पिडीतेची टिंगलटवाळी केली असल्याची माहिती असल्यामुळे पोलिसांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस केली. अगदी ज्या मित्रांसोबत घटनेची दिवशी वाढदिवस साजरा करत असल्याचेही सांगत होता, त्यांना देखील बोलते करण्यात आले. सोन्याच्या मित्रांनी पोलिसांना संगीतले की आम्ही त्याचा वाढदिवस २३ जुलै रोजी केला होता, ३० जुलैला नाही. आपले पितळ उघड होत असल्याचे दिसूनही सोन्या पोलिसांना मात्र उलट-सुलट उत्तरे देतच होता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवातच तो पोपटासारखा बोलू लागला.

गावात बदनामी होण्याच्या भीतीने केला निर्घृण खून !
२९ जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असतांना सोन्याने पिडीतेला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या पिडीतेने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे घाबरलेल्या सोन्याचे तिचे तोंड दाबून डोक्यात दगड घातला. यामुळे पिडीत बालिका जागेवरच कोसळली. यानंतर सोन्याने गोठ्यातच असलेल्या कडब्याच्या कुट्टीत पिडीतेला दाबून टाकले.

मृतदेहाची दुसरीकडे विल्हेवाट लावणे शक्य झाले नाही !

पिडीत बालिकेला कडब्याच्या कुट्टीत दाबून ठेऊन नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची सोन्याची योजना होती. परंतू गावातून अचानक आठ वर्षाची बालिका गायब झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे दिवसभर तसेच रात्री उशिरा देखील गावातील चौका चौकात ग्रामस्थ चर्चा करत होते. त्यामुळे सोन्याचा मृतदेह दुसरीकडे नेत विल्हेवाट लावणे शक्य झाले नाही. कडब्याच्या कुट्टीतून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीस आला.

मृतदेह होता कुजलेला !

भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पिडीतेचा मृतदेह दोन दिवस कुट्टीत असल्यामुळे कुजलेला होता. सोन्या उर्फ स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यात ३०२ अर्थात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कलम वाढविण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे.

यांनी केली गुन्ह्याची उकल !
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.पो.नि. निलेश राजपूत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरिष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे आदींनी या गुन्ह्याचा उलगडा केला.

बालिकेवर शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार !
बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मृत बालिकेची पोलिस बंदोबस्तात अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत शेकडो ग्रामस्थ सामील झाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव पाटील, पो.नि. राहुल खताळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच भडगाव, पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यासह चाळीसगाव उपविभागातील ३ अधिकाऱ्यांसह २५ कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका !
अल्पवयीन मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आला होता. दरम्यान, जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी भूमिका मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घेतली होती. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांची समज काढल्यानंतर मुलीवर रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पो.नि. राहुल खताळ यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता. तर भडगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडून अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव पाटील या तपासाला गती दिली होती.


तात्काळ चौकशी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश !

बालिका मृत्यूप्रकरणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांना दिले आहेत. या घटनेची माहिती कळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

नात्याला काळीमा : सावत्र बापाकडून अत्याचार ; १३ वर्षीय मुलगी गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच !

April 19, 2021

मॉर्निंग वॉक व व्यायाम घरीच करून प्रशासनाला सहकार्य करा : फारूक शेख

May 19, 2021

सोमय्यांच्या हनुवटीला झालेली ‘ती’ जखम कृत्रिम? ; सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार !

April 25, 2022

पालकमंत्र्यांकडून पाळधी–तरसोद बायपास रस्त्याची पाहणी

July 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group