जळगाव (प्रतिनिधी) एसटीने भाडे दरवाढ केल्यामुळे गरीब प्रवाशांचे खिसे ढासळत आहेत. ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीने १५ टक्के भाडे वाढवले असून, त्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगावहून मुंबईच्या प्रवासाचा भाडे आता १२२ रूपयांनी वाढला आहे, तर पुण्याचा भाडे ९४ रूपयांनी वाढला आहे. भाडे दरवाढीची घोषणा झाल्यानंतर जळगाव आगाराने लांब आणि कमी पल्ल्याच्या प्रवासांसाठी नवे तिकीट दर जाहीर केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत, तसेच सीएनजी आणि इंधनाचे दर वाढले आहेत. यासोबतच एसटीच्या सुट्या भागांचे वाढलेले दर देखील यामध्ये कारणीभूत ठरले आहेत.
ग्रामिण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या भाडे दरवाढीमुळे २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून प्रवास महागला आहे. शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी प्रवास मोफत ठेवला आहे आणि महिलांसाठी तिकीटावर ५० टक्के सूट दिली असली तरी, महागाईमुळे खर्चात झालेली वाढ पाहता भाडे दरवाढ अनिवार्य ठरली आहे.
जिल्ह्याच्या आतल्या प्रवासाच्या दरातही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रवासाचे भाडे ७ ते २२ रूपयांपर्यंत वाढले आहे. जळगाव ते जामनेर किंवा धरणगाव या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना ६ रूपयांची अधिक वाढ सहन करावी लागणार आहे, तर जळगाव ते चाळीसगाव मार्गावर २२ रूपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ठिकाण पूर्वीचे दर (₹) वाढलेले दर (₹)
जळगाव ते छ. संभाजीनगर २४५ २८२
जळगाव ते मुंबई ८७५ ९९७
जळगाव ते नाशिक ३७५ ४३३
जळगाव ते पुणे ६०० ६९४
जळगाव ते धुळे १४० १६२
जळगाव ते जालना २५५ २१२
जळगाव ते नागपूर ६५५ ७५५
जळगाव ते सोलापूर ६९५ ८०५
जळगाव ते चाळीसगाव १५० १७२
जळगाव ते रावेर ११५ १३२
जळगाव ते चोपडा ९५ ११२
जळगाव ते यावल ७० ८१
जळगाव ते मुक्ताईनगर ९५ ११२
जळगाव ते पारोळा ९० १०२
जळगाव ते एरंडोल ५५ ६१
जळगाव ते जामनेर ६० ७१
जळगाव ते पाचोरा ८० ९१
जळगाव ते भुसावळ ४५ ५१
जळगाव ते धरणगाव ५५ ६१
जळगाव ते भडगाव ९५ ११२