TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई-वडिलांनी लावून दिले लग्न, विवाहिता प्रियकरासोबत पळाली ; प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय !

प्रेम कहाणीचा भयाण शेवट, छत्रपती संभाजीनगरातील घटना ; मुक्ताईनगरच्या प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) एकमेकांवर प्रेम असूनही कुटुंबाने विरोध करत मुलीचे लग्न लावून दिले. मात्र, महिन्याभरात मुलीला त्रास सुरू झाला. तिने तिच्या प्रियकराला ही बाब कळवताच त्याने तिला आपण पुन्हा लग्न करू, तू काळजी करू नको असा विश्वास दिला. परंतू यानंतर प्रेमीयुगुलाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजता रेल्वेस्थानक परिसरात दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली. यात रमेश (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची १९ वर्षांची प्रेयसी राणी ( दोघांचे काल्पनिक नाव) गंभीर जखमी झाली.

कुटुंबाच्या चिडचिडीनंतर आत्महत्येचा निर्णय !
दोन वर्षांचे प्रेम असूनही कुटुंबाने विरोध करत मुलीचे लग्न लावून दिले. मात्र, महिन्याभरात मुलीला त्रास सुरू झाला. तिने तिच्या प्रियकराला ही बाब कळवताच त्याने तिला आपण पुन्हा लग्न करू, तू काळजी करू नको, असे आश्वासन दिले. सोमवारी तिला ठाण्यातून घेत पुण्याला नेले. तेथून मित्रांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगरला घ्यायला बोलावले. मात्र, मित्र अजिंठापर्यंत पोहोचलेले असतानाच फोनवरच आम्ही आत्महत्या करत असल्याचे सांगत दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कुटुंबाने समजून न घेतल्याने उचलले टोकाचे पाऊल !
दोघांनी घर सोडल्याची माहिती तोपर्यंत नातेवाइकांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे दोघांना सलग कॉल सुरू झाले. राणीने मोबाइल बंद केला. मात्र, रमेशला कॉल सुरूच होते. आई, वडील, भावासह राणीचे नातेवाईक त्याला संपर्क करून रागावत होते. रमेशचा भाऊ मात्र त्यांना समजावून सांगत होता. रमेशला मात्र इतर नातेवाइकांचे रागावणे असह्य झाले. हे आपले लग्न लावणार नाहीत, असे म्हणत सोबतच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

नात्यातच असलेले रमेश व राणी या दोघांचे दोन वर्षांपासून एकमेकावर प्रेम होते. आठ महिन्यांपूर्वी रमेश शिक्षणासाठी पुण्याला भावाकडे गेला होता. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी कुटुंबाने मात्र राणीचे मध्य प्रदेशच्या मुलासोबत लग्न लावले. हा प्रकार रमेशला असह्य झाला होता. लग्नानंतर काही दिवस त्यांचा संपर्क तुटला; परंतु २७ मार्च रोजी राणी पतीसह ठाण्याला स्थायिक झाली. तेव्हा तिने रमेशला संपर्क केला. माझा पती मला त्रास देत आहे, असे सांगितले. तेव्हाच रमेशने पुन्हा राणीला लग्नाचे वचन देत पळवून नेण्याचा निश्चय केला. ठाण्याला जात त्याने टॅक्सीने राणीसह पुणे गाठले. मंगळवारी दोघे साडेदहा वाजता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. तेव्हाच रमेशने गावाकडील मित्रांना आम्हाला संभाजीनगरला घ्यायला या, असे कॉल करून सांगितले होते.

हातात हात घेत रेल्वेसमोर घेतली उडी !
रात्री साडेदहा वाजता दोघेही रेल्वेरुळाजवळ उभे होते. राणी कॉलवर बोलत असतानाच रमेशने तिच्या पकडलेल्या हातासह रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेच्या धडकेत दोघेही लांब फेकले गेले. रमेश मात्र गंभीर जखमी झाला. राणी जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडत होती. स्थानिकांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना घटनेची माहिती दिली. बागवडे यांनी तत्काळ पथक रवाना केले. रमेशच्या शरीराचे तुकडे झाले होते तर राणी मात्र शुद्धीत होती. तिला पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.

मला उमेशला बघायचेय, राणीचा आक्रोश !
रात्री साडेदहा वाजता घटना घडल्यानंतर राणी जखमी झाली. मात्र, अंधारात रमेश मात्र तिला दिसत नव्हता. पोलिस पोहोचल्यानंतर ती सतत मला रमेशला पाहायचेय, असे म्हणत होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतरदेखील ती सतत मला रमेशला शेवटचे पाहू द्या, अशी विनंती करत होती. सायंकाळी पाच वाजता रमेशवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वाद ; पोलिसांवरही हल्ला,वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोंगरावर फिरायला गेलेल्या वाहिनीकडं केली ‘ही’ मागणी ; विरोध करताच डोकं दगडानं ठेचलं !

September 21, 2021

झोपेत हाताच्या करंगळीला सर्पदंश ; बालिकेचा मृत्यू !

September 20, 2023

लस निर्मात्यांना खटल्यांच्या त्रासापासून दूर ठेवा, : अदार पुनावाला

December 20, 2020

धर्मक्रान्ति करुन बाबासाहेबांनी जगात नवा इतिहास निर्माण केला : जयसिंग वाघ

October 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group