TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईनेच केला सुपारी देऊन मुलाचा खून, सहा जणांना अटक ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

दहा दिवसांनी खुनाचा उलगडा ; आई, मावसा, मावशी व मावस भाऊला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) मुलाचे वर्तन सुधारत नाही, त्याच्या पुढे हतबल झाली आहे, असे सांगत आईनेच मुलाच्या खुनाची सुपारी दिली. त्यासाठी मुलाचा मावसा, मावशी व मावस भाऊ यांची मदत घेतली. दोघांनी दोन हजार रुपये अॅडव्हान्स घेऊन मुलाला चौसाळा जंगलात नेले. तेथे गळा आवळला व दगडाने प्रहार करून त्याचा खून केला. २० एप्रिल रोजी घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली. लोहारा पोलिसांनी या गुन्ह्यात मृताच्या आईसह सहा जणांना अटक केली आहे. योगेश विजय देशमुख (२५, रा. नेरपिंगळी, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे.

आई, मावसा, मावशी व मावस भाऊला अटक !
या प्रकरणात पोलिसांनी त्याची आई वंदना विजय देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी, मावसभाऊ लखन चौधरी (तिघे रा. देवीनगर, यवतमाळ) यांना अटक केली. तर सुपारी घेऊन योगेशची हत्या करणारे विक्की भगत व राहुल पठाडे (रा. देवीनगर, लोहारा) यांनाही ताब्यात घेतले आहे. मुलाचा प्रचंड त्रास आहे, त्याच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे आईने पोलिसांना सांगितले. मुलाला त्याच्या गावावरून यवतमाळात पाठविले. तो मामाकडे काही दिवस राहिला. या दरम्यान आई वंदना हिने बहीण उषा चौधरी हिच्या घरी जाऊन योगेशच्या खुनाचा कट रचला.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

पाच लाखांत खुनाची सुपारी !
पाच लाख रुपयात खुनाची सुपारी देण्याचे ठरले. त्यापैकी दोन हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आला. विकी भगत व राहुल पठाडे या दोघांनी योगेशला २० एप्रिल रोजी चौसाळा जंगलात नेऊन त्याची हत्या केली. दोघांनी योगेशचा गळा आवळला. नंतर दगडाने त्याच्यावर प्रहार केले. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा योगेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्याच्या खिशात डॉक्टरची चिठ्ठी सापडली. त्यावर योगेशच्या आईचे नाव व संपर्क क्रमांक नमूद होता. त्यावरून लोहारा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली आणि तपास सुरू केला होता. या प्रकरणी योगेशचे मामा प्रफुल्ल वानखेडे (रा. बांगरनगर) यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध कट रचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026

OBC आरक्षणाशिवाय राज्यात १०५ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदांसाठी आज मतदान

December 21, 2021

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

November 26, 2021

एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group