चोपडा (प्रतिनिधी) निवडणुका झाल्या. निकाल लागले. निकाल नेत्यांसाठी धक्कादायक आहेतच. पण जो तळागळातील कार्यकर्ता होता त्याला कदाचित हा निकाल अपेक्षितच होता.
संविधान आणि आरक्षण आणि जातीनिहाय गणना ह्या मुद्द्यांना घेवून हिंदूं मधील जात व्यवस्थेचे संघर्षात रूपांतरित करण्याचा आपल्या ठिकाणी समजदार होते ह्या सगळ्यांना हिंदू समाजाने एकमुखाने नाकारत कायमचे घरी बसवले आहे.
महाराष्ट्राचे उद्योग गुजरातने पळवले गुजरातचे महाराष्ट्रावर आक्रमण हे भंपक विमर्श पसरवणाऱ्या नेत्यांना आणि त्याचे प्रसारण करणाऱ्या माध्यमांना समाजाने जागा दाखवून दिली आहे. मोदी, शहा, योगी यांचा पावला पावला वर अपमान करणे त्यांच्या बद्द्ल अपमानास्पद शब्द प्रयोग करणे आणि अदानी,अंबानी यांच्या वर टीका करणे, 50 खोके, एकदम ओके, आणि विकासाला विरोध हे आता लोकांना सहन होण्याच्या पलीकडे होते. महिलांच्या प्रती दुय्यम भाव , त्यातून लाडकी बहीण योजनेला विरोध याचा महिलांच्यावर होणारा परिणाम हे लक्षात न घेता उद्धट पणे बोलत राहणे. लोकांना हे कळत होते. महिलांना कळत होते “लव्ह जिहाद” कडे काना डोळा करणारे सरकार महिलांना नको होते.
बटेंगे तो कंटेंगे…एक है तो सेफ है….! हे महायुतीचे सोलग्न जनतेला जास्त आवडले. लाडकी बहीण योजना सुध्दा प्रभावी ठरली. आणि स्थानिक महायुतीच्या लोकांनी विकासकामांचा आलेखच समोर ठेवल्याने आणि लाडकी बहीण, तसेच हिन्दु जागृत झाल्याचे मतदान पेटीतून दिसून आला.
नेत्याना अति आत्मविश्वास नडला — उबाठाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे हे तर शांत स्वभावी असले तरी चोपड्यात त्यांना असं भासवल गेलं की, आप्पा या वेळेस तुम्हीच निवडून येत आहे चिंता करण्याची गरज नाही.आणि हा अति आत्मविश्वासच स्थानिक नेत्यांना नडला. मतदारावरील पकड ही कमी झाल्याचे स्पष्ट दिसत होते.लहान कार्यकर्ते पोट तिडकीने सांगत होते मात्र नेते मंडळी त्या कार्यकर्त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. त्यामुळेच कार्यकर्ते सुध्दा नाराज दिसत होते. आणि उमेदवाराला कार्यकर्त्यांची नाराजी भोवली.तालुका पिजून काढल्याचा काही लोक दाखवत होते.मात्र प्रत्यक्षात मात्र सामान्य मतदाराला भेटलेच नाही त्यामुळेच पराभव निश्चित झाला होता.
चंद्रकांत अण्णा कडे कार्यकर्त्यांची फळी मजबुत
नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत आण्णा सोनवणे हे एकटे पडले होते यांच्या विरोधात तालुक्यातील सर्वच नेते मंडळी उभी होती मात्र चंद्रकांत आण्णा हे डगमगता स्थिर राहून संयम ठेवत निवडून येण्यासाठी काय करावे लागेल? यांचे प्लॅनिंग सुरू ठेवले. आण्णा कोणीही भेटायला गेले असेल तर ते सामान्य कार्यकर्त्याला विचारत असतं की, आपण कुठे कमी पडू? ते त्यांचा सल्ला घेऊन सुधारणा करत असत.त्यामुळे यश संपादन करण्यात मोठी अडचण आली नाही. कार्यकर्त्यांची जुडवा जुडव करून ठेवली. कार्यकर्त्यांना यथोचित मानसन्मान दिल्याने आणि हिंदु म्हणून चंद्रकांत आण्णा सोबतच रहा असा निर्धार कार्यकर्त्यांनी पक्का केला त्यामुळे यश आपल्या पारड्यात 23 मतदानाची आघाडी घेत यश पाडून घेतले.
नेते फेल…अण्णा किंग मेकर — उबाठा गटाच्या उमेदवार प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्याकडून माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई सह ,मराठा समाजाचे नेते, गुजर समाजाचे, व इतर पगड जातीचे नेते असे करून नेते,मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतांना सुद्धा अप्पा राजकारणातील बळी ठरले कसे? असा यक्ष प्रश्न येथील मतदारांना पडला आहे.
लोकसभेच्या वेळेस श्रीराम पाटील, तर अगोदरच्या विधानसभा निवडणुकीत माधुरीताई पाटील हे बळी ठरले. अश्या एक च्या मागे एक बळी ठरत असतील तर यापुढे यांना उमेदवार मिळणे ही कठीण होईल.तालुक्याचे सर्व दिगग्ज एकत्र होऊन ही अण्णाला पराभूत करणे शक्य नसेल तर नेते फेलच ठरतात आणि अण्णा मात्र किंग मेकर ठरत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम जाणवणार !
या निवडणुकीचा विचार करता यांचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाहायला मिळेल. अरुणभाई ची सत्ता असलेल्या संस्थावर प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे यांचेच वर्चस्व दिसेल.