TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरणामाई भागवणार पाळधी वासियांची तहान !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रूक या दोन्ही मोठ्या गावांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळत जलजीवन मिशनच्या अंतर्गत गिरणेवरून पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. अलीकडेच वाघ नगरातील जनतेला पाणी पुरवठा केल्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या स्वत:च्या गावातील जनतेची पाण्याची समस्या कायम स्वरूपी संपुष्टात येणार असल्याने गिरणा माई पाळधी करांची तहान भागविणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक ही दोन्ही मोठी गावे असून त्यांची एकत्रीत लोकसंख्या ही सुमारे ४० हजार आहे. ना. गुलाबराव पाटील हे स्वत: येथील रहिवासी असून त्यांनी गावासाठी आजवर विविध विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पाळधीकरांसाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन दिले होते. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली आहे.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

या अनुषंगाने पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहित निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे सदर नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांनी शासनाकडे तांत्रिक मान्यता देऊन सादर केला होता. जल जीवन मिशन चे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या तांत्रिक छाननी समितीची बैठक ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती त्यात अंदाजपत्रकात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये ४१२५ इतका दरडोई खर्च असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या २० कोटी ९० लक्ष ६५ हजार इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेच्या अंतर्गत गिरणा नदीतून पाण्याची उचल करून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील एका टेकडीवर उभारण्यात आलेल्या जलकुंभात टाकण्यात येणार आहे. येथून हे पाणी पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांना जलवाहिन्यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. दोन्ही गावांची भविष्यातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनीची आखणी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) कालच जाहीर करण्यात आलेला आहे. लक्षणीय बाब म्हणजे जलजीवन मिशनच्या अंतर्गत कार्यान्वित करण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. अर्थात, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा करण्याच्या दिशेने आपल्या गावातूनच सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच जळगाव शहराचा विस्तारीत भाग असणार्‍या वाघनगरसह परिसरातील नागरिकांसाठी थेट वाघूर धरणावरून पाणी आणून त्यांनी तहान भागविली आहे. या पाठोपाठ आपल्या स्वत:च्या गावातील नागरिकांची पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता पालकमंत्र्यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कात येणार्‍या प्रत्येकाने कोरोना चाचणी अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

June 28, 2022

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता !

October 27, 2024

एलियन्स आणि मनुष्य भेटणार ? ; काय सांगीतलं वैज्ञानिकांनी, जाणून घ्या… !

November 4, 2021

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group