धरणगाव- येथील लोणावळा २८ जानेवारी दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक धरणगाव यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बँको ब्लू रिबन पुरस्कारात प्रथम क्रमांक पटकावला.
Galaxy INMA आणि Avis Publication यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २०० ते २२५ कोटी रुपये कार्यक्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून बँकेचा गौरव करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे निवृत्त महाप्रबंधक बॅनर्जी यांच्या हजते पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार बँकेस सलग पाचव्यांदा मिळण्याचा गौरव प्राप्त झाला आहे.
या समारंभाला बँकेचे चेअरमन
प्रवीण कुडे तसेच संचालक दत्ताजी महाजन व सचिन बागुल व मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी व बँकेचे अधिकारी ज्ञानेश्वर भामरे यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्यात आला
बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची दखल घेत हा पुरस्कार बँकेच्या विश्वासार्हतेचे आणि उत्कृष्ट सेवा व्यवस्थापनाचे प्रतिक ठरला आहे.
त्यानिमित्ताने सहकार क्षेत्रात बँकेचे जिल्ह्यात कौतुक करण्यात येत आहे.