धुळे (वृत्तसंस्था) येथील पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सप्तशृंगी पोलीस सोसायटीत न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, धुळे शहरातील देवपूर पश्चिम हद्दीतील सप्तशृंगी पोलीस कॉलनी सोसायटीत गोकुळ लुखा कंखरे हे प्लॉट नंबर ९८७ येथे राहतात. त्यांना दोन मुले असून एक मुलगा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत असून, दुसरा मुलगा धडगाव येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. घर मालक गोकुळ लुखा कंखरे यांचे शनिवारी निधन झाल्याने त्यांना त्यांच्या चार्डी या गावी अंत्यविधीसाठी कुटुंबीय घेऊन गेले होते. अशात घरी कोणीही नसल्याची संधी साधून रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत कपाटातून अंदाजे आठ हजार रुपये रोकड तसेच एक तोळे सोन्याचे दागिने चोरी करून पोबारा केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू त्यांची पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
















