TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आलेत ; अजित पवार यांची घणाघाती टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2023
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) सध्याच्या सरकारमध्ये तुझ्यापेक्षा मी मोठा ही जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. सध्याच्या शिंदे सरकारने देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात देऊन देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय. नंतर या बातमीमुळे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सारवा सारव करत नवीन जाहिरात टाकली. पण त्या जाहिरातीमध्ये शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे फोटो होते आणि तेही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सरकार अजूनही त्यांना पाठीशी घालत आहे, म्हणून हे सरकार तर जाहिरातीचे सरकार आहे. सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आले असल्याची घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्ष ते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. ते अमळनेरला आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार फक्त प्रशासन बदल्या करताना दिसत आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना याचा फटका बसत आहे. सध्या बेरोजगारी आणि महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. राज्यातील कारखाने दुसऱ्या राज्यात निघून गेली आहेत. हे सरकारचे अपयश आहे. परराज्यात व्यवसाय गेले याची सरकारला पडलेली नाही. अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, कांदा उत्पादन करणारा शेतकरीला काहीच मिळाले नाही. त्यांचा खर्चही निघाला नाही त्यांना कोणतीही मदत या सरकारने दिली नाही अजून सरकार म्हणतोय शासन आपल्या दारी यातून काही साध्य होणार नाही. ग्रामीण भागात विजेची समस्या ही नियमित झाली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

शिंदे सरकार म्हणते 10 तास विज देणार पण मिळाली नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना ट्रान्सफोर्मेर मिळत नाही. सध्या महाराष्ट्रात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करून दंगली घडवल्या जात आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांचा दरारा राहीलेला नाही. शासनाचा हस्तक्षेप वाढला आहे. सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आले आहेत. सरकारने जाहिरातीवर करोडो रूपायाचा खर्च केला आहे.
पाच मंत्र्यांवर भष्टाचाराचा आरोप असूनही कारवाई नाही. शेतकरी, तरुण वर्ग नाराज आहे. दोन हजार रुपयाची नोट बंद करून त्या नोटा आरबीआयकडे आल्या नाही, सध्या कुठे गेल्या?, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. चांगल्या कामासाठी देशाच्या भल्यासाठी आम्ही सहन करायला तयार आहोत. पण आता सहनशीलता संपली आहे. मागे किती काळापैसा बाहेर आला ते सांगा, सरकारकडे त्याचे उत्तर नाही.

संजय राऊत धमकी प्रकरणी सत्ताधारी खोटी धमकी असल्याचा आरोप करत आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, योग्य तपास करून कारवाई झाली पाहिजे. गरीबाची मूले शिक्षणापासून वंचित राहू नये. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना समानता या तत्त्वानुसार जुनी पेंशनचा प्रश्न, सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, अभ्यास समिती नेमली आहे तिचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. पाडळसरे धरणाला जास्तीत निधी द्यावा. आमच्या सरकारने मोठा निधी दिला होता शिंदे सरकारनेही धरणाचे काम बंद न करता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा.

प्रत्येक राज्याने दोनपेक्षा अधिक अपत्याचा कायदा आणावा. तर समान नागरी कायदा यावर पवार म्हणाले की, गरीबावर अन्याय होता कामा नये. या विषयावर चर्चा करुन निर्णय झाला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप बाबत वाद होणार नाहीत. सामोचाराने प्रश्न सोडवणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ज्या पक्षाची ताकद जिथे असेल तिथे त्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल. त्यामुळे सध्या मीडियामधील उलट सुलट बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही असेही त्यांनी सांगितले. देशात मोदींमुळे भाजप सत्तेत आहे. जसे राजीव गांधी, इंदिरा गांधीमुळे सत्तेत काँग्रेस सरकार होते हे विसरून चालणार नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी सडेतोड उत्तरे दिली. यावेळी माजी आमदार सतीश पाटील, दिलीप वाघ,कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या नामघोषात यावर्षीही दुमदुमणार पंढरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ एसबीआय आनंद नगर शाखेत कोट्यावधीच्या कर्ज घोटाळ्याची तक्रार ; चौकशीला सुरुवात !

October 30, 2020

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता ११ ऑगस्ट रोजी निवड चाचणी

July 23, 2021

पदोन्नतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, मध्यरात्री घरी परत जायला निघालेल्या तरूणासोबत घडलं आक्रीत !

May 15, 2023

समस्त माळी समाजातर्फे अँड. संजय महाजन यांचा सत्कार

June 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group