TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

चाकू, सळई, फायटर, काठ्यांचा सर्रास वापर; दोन्ही गटातील ७ जण जखमी, ११ जणांवर गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – मागील भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील खवशी येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दंगलीत चाकू, लोखंडी सळई, फायटर आणि काठ्यांचा सर्रास वापर केल्याने दोन्ही गटांतील ७ जण जखमी झालेत. ही घटना १३ जूनला रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण ११ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खवशी येथील सीमा अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा पुतण्या प्रतीक जगतराव पवार हा १३ जूनला गुरांना पाणी पाजण्यासाठी सार्वजनिक हाळावर गेला होता. त्याचा दर्शन भूषण गोसावी, भूषण सुरेश गोसावी आणि दीपक उर्फ कांतीलाल सुरेश गोसावी यांच्याशी मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली होती. तर, गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र रात्री साडेनऊ वाजता सीमा पवार या घरासमोर ओट्यावर बसलेल्या असताना दीपक, भूषण, दर्शन, कल्याणी कांतीलाल गोसावी, रुपाली भूषण गोसावी तसेच त्यांच्या सोबत खेडी, नांद्री, अमळगाव, अमळनेर व गांधली येथील सुमारे २० ते २५ जण आल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या वेळी जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ सुरू झाल्यानंतर सुलभा दिनकरराव पवार व शालुबाई जगतराव पवार या महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भूषण गोसावी याने चाकूने सुलभा पवार यांना मारहाण करून खाली पाडल्याचा आरोप – केला आहे. तसेच दीपक गोसावी याने शालुबाई पवार यांच्या डाव्या हाताच्या बोटावर चाकूने वार केला, तर दर्शन गोसावी याने सीमा पवार यांच्या तळहातावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरडाओरडा झाल्यानंतर जगतराव मधुकर पवार, दिनकर मधुकर पवार आणि प्रतीक पवार हे भांडण सोडवण्यासाठी आले असता काही अनोळखी व्यक्तींनी प्रतीक याला धरून ठेवून त्याच्यावर फायटर व काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोसावी कुटुंबातील ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करत आहेत.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

दरम्यान, दुसऱ्या गटातील दर्शन भूषण गोसावी यांनीही अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते, त्यांचे वडील भूषण गोसावी आणि काका दीपक गोसावी हे प्रतीक पवारच्या वडिलांना त्याच्या वर्तनाबाबत समजावण्यासाठी गेले असता वाद निर्माण झाला. या वेळी शालुबाई पवार व सीमा पवार यांनी भूषण गोसावी याची कॉलर पकडली, तर दर्शन गोसावी याला खाली पाडले. त्यानंतर जगतराव पवार यांनी लाकडाने भूषण गोसावी यांच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली. प्रतीक पवारने दर्शनच्या डोक्यात वीट मारली, तर राज अनिल शिरसाठ याने लोखंडी सळईने डोक्यावर वार केल्याचे तसेच दगडू नाना शिरसाठ यांनीही लोखंडी सळईने मारहाण केल्याचे नमूद केले आहे.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दीपक गोसावी यांनाही मारहाण करून जखमी केले. गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवल्यानंतरही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक पवार, जगतराव पवार, राज शिरसाठ, दगडू शिरसाठ, शालुबाई पवार आणि सीमा पवार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास हे. कॉ. विजय भोई करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerViolent Clash Between Two Groups in Khavshi

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्वसामान्यांना दिलासा ! एप्रिलच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात घट

June 13, 2022

७३ लाख ८७ हजाराचा अवैध गुटखा पकडला ; चाळीसगाव पोलिसांची धाडसी कारवाई !

May 23, 2022

‘केंद्र सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला’ : अमर्त्य सेन

June 5, 2021

भाजयुमो आक्रमक ; मंत्रालयाबाहेर नवाब मलिकांच्या पुतळ्याचं दहन

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group