TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
June 10, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी तथा डॉ. विजय नवल पाटील आर्मी स्कूलमधील कर्मचारी चेतन शांताराम महाजन (वय ३७) यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान घडली. दरम्यान, चेतन महाजन हे आपल्या दीड वर्षांच्या मुलासाठी अमळनेरच्या बाजारातून आंबे आणि पाणीपुरी घेऊन घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

चेतन महाजन हे अमळनेर येथील डॉ. विजय नवल पाटील आर्मी स्कूलमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. अतिशय मनमिळावू, कष्टाळू आणि सर्वांना मदत करणारा युवक अशी त्यांची ओळख होती. दररोज ते आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच १९, डीटी ५२४०) या दुचाकीने रोटवद ते अमळनेर असा प्रवास करत असत. तर, चेतन महाजन हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेसाठी ८ जून रोजी दुपारी अमळनेर येथे आले होते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बाजारात खरेदी केली आणि सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी कोमल महाजन यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घरी येण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी चेतन महाजन यांनी आपण दहिवद फाटा पार केला असून अवघ्या १५ ते २० मिनिटांत रोटवद येथे पोहोचणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते घरी ही पोहोचले नाहीत. रात्री उशिरापर्यंत चेतन महाजन यांचा काहिही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दहिवद फाटा, पातोंडा परिसर तसेच आजूबाजूच्या भागात रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू असताना नांद्री गावाजवळील बसस्थानक परिसरात काही नागरिकांनी दहिवद फाटा ते नांद्री रस्त्यादरम्यान एका व्यक्तीचा दुचाकीसह रस्त्यालगतच्या खोल खड्यात पडल्याची माहिती दिली. त्यानुसार नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या खड्यात चेतन महाजन हे दुचाकीसह पडलेले आढळून आले. त्यांच्या तोंडाला तसेच हात, पायांना गंभीर इजा झालेली होती. तर, दुचाकीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने खासगी रुग्णवाहिका बोलावून त्यांना अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. तर, अपघात नेमका कशामुळे झाला, वाहन घसरले की अन्य कोणते कारण होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करत आहेत. मयत चेतन महाजन यांच्या पश्चात पत्नी कोमल, दीड वर्षांचा मुलगा शिव आणि दिव्यांग आई असा परिवार आहे.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerYouth from Rotwad dies in accident

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, अनेक जण वाहून गेल्याची शक्यता

February 7, 2021

भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष ; भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ उद्या गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट !

April 24, 2022

भयंकर ! आईनेच दोन महिन्यांच्या चिमुकलीला मारून ओव्हनमध्ये टाकलं ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

March 22, 2022

धक्कादायक : असोद्यात गुंडाकडून मध्यरात्री हवेत गोळीबार !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group