TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तीन आरोपी अटकेत

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) – गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या इको कारमधून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, पाकीट व इतर साहित्य चोरी करणाऱ्या तीन आरोपींना सावदा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपींकडून फिर्यादीचे पाकीट, महत्त्वाची कागदपत्रे, रिकामी सॅक व लेडीज पर्स जप्त करण्यात आली असून चोरीच्या रोख रकमेचा शोध सुरू आहे.

दि. १९ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजता भुसावळ येथील शेख समीर शेख दगडू (वय २५) हे मित्र-मैत्रिणींसह गारबडी धरण परिसरात इको कार (एमएच ०२ सीएच ८४९९) ने फिरण्यासाठी आले होते. त्यांनी वाहनाचा हप्ता भरण्यासाठी जमा केलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, पाकीट व अन्य साहित्य कारमधील सॅकमध्ये ठेवले होते. धरण परिसरात फिरण्यासाठी गेल्यानंतर कारचे दरवाजे बंद असले तरी डिक्की लॉक नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डिक्की उघडून सॅक, पाकीट व इतर साहित्य लंपास केले.

READ ALSO

वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची ‘उडान’ला सदिच्छा भेट; दिव्यांग बालकांसोबत साजरा केला आनंदाचा क्षण

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात दि. २० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गारबडी धरण परिसरात संशयितांचा शोध घेतला. त्यावेळी फिर्यादीने तीन संशयितांना ओळखल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजू रज्जाक तडवी (रा. खिरोदा, ता. रावेर), शरीफ वजीर तडवी (रा. चिचाटी, ता. रावेर) आणि अकिल उस्मान तडवी (रा. लोहारा, ता. रावेर) अशी आहेत.

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये आरोपी शरीफ वजीर तडवी याच्याकडून फिर्यादीचे चोरीस गेलेले पाकीट तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आरसी बुक व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर कसून चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत आरोपींच्या सांगण्यावरून एक रिकामी सॅक व लेडीज पर्स जप्त करण्यात आली असून, चोरीतील दीड लाख रुपयांच्या रोख रकमेची विल्हेवाट कुठे लावली, याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThree accused arrested in connection with a theft worth ₹1.5 lakh in the Garbardi Dam area.

Related Posts

जळगाव

वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची ‘उडान’ला सदिच्छा भेट; दिव्यांग बालकांसोबत साजरा केला आनंदाचा क्षण

July 24, 2026
जळगाव

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

July 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
Next Post

वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची 'उडान'ला सदिच्छा भेट; दिव्यांग बालकांसोबत साजरा केला आनंदाचा क्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव रुग्णालयाला पालकमंत्र्यांनी दिली भेट !

April 27, 2021

लसीकरणास मुभा नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर करावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

December 3, 2021

जळगावच्या व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक

November 17, 2025

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

July 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group