जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळातील 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीची आज सुटका झाली, त्यानंतर तीन तणावग्रस्त हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली. जखमी झालेल्या तरुणाचे प्रतीक हरिदास निंबाळकर (वय 29 रा. जुने कानळदा रोड सिटी कॉलनी, जळगाव) असे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या प्रतीक निंबाळकर याला गेल्या चार वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगावी लागली होती. आज न्यायालयाच्या अटींनुसार त्याचा जामीन मंजूर करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सायंकाळी ७ वाजता प्रतीक त्याच्या भाऊ वैभव निंबाळकर यांच्यासोबत दुचाकीने घरी जात असताना, शाहूनगर येथील धरम हॉटेलजवळ त्याला टपून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून डोक्यावर गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे.