चोपडा (लतीश जैन) चोपड्या पासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर असलेले वेले गावाच्या बस स्टॅन्ड जवळ मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूरकडून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रकने अचानक रस्त्यावर पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
आग एवढी भयंकर होती की, ट्रक संपूर्ण जळून खाक झाला आहे. नगरपालिकेला गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी फोन केले असता नगरपालिका अग्निशामक हे वेळेवर पोहोचले नाही. साधारण 35 ते 40 मिनिटांनी अग्निशामक हे घटनास्थळी पोहोचले. तोवर ट्रक जळून खाक झाला होता. नगरपालिकेची हलगर्जीपणामुळे नेहमी असले प्रकार चोपडा शहरात घडत असतात. चोपडा नगर परिषदकडे अद्यावत यंत्रणा नसल्याने उपसरपंच दीपक पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रक क्र. (MH 04 DS 6609) हा रस्त्याच्या कडेला करण्यासाठी गावातील नागरिकांनी स्वखर्चाने जेसीबी मागून ट्रक रस्त्याच्या कडेला केला. दरम्यान, गावकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे आग आजू-बाजू पसरली नाही. आग जर दुकान किंवा घरांपर्यंत पोहोचली असती, तर मोठी दुर्घटना होण्याची भीती होती.
आगग्रस्त ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम व इतर काही सामान असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. केमिकलचे ड्रममुळे आग झपाट्याने वाढल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ड्रायव्हर शेख असिफ, गाडी मालक सय्यद अली (रा. मालेगाव), वेले गावाचे उपसरपंच दीपक पाटील,सोनू काजी,शहाबाज खान, बिलाल शेख,चेतन कानडे,शिवा पाटील यांच्यासह गावातील नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सर्व दुकानांचा धोका टळला. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले होते. केमिकल कोणत्या प्रकारचे होते?,काय कामासाठी वापरण्यात येणार होते?, ते अजून स्पष्ट झाले नाही.