धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते तथा माजी नगरसेवक अकिल मोमीन यांना धरणगावकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
अकिल मोमीन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावकरांच्या वतीने गुरुवारी पाताळनगरी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वसीम शेख यांनी केले. तत्पूर्वी दिवंगत अकिल मोमीन यांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, ज्येष्ठ पत्रकार कड महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, माजी नगरसेवक दीपक वाघमारे, लक्ष्मणराव पाटील, बाबा भाटिया, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विठोबा माळी, राजेंद्र महाजन, पी. डी. पाटील, हेमंत माळी, आर. डी. महाजन, शिरीष बयस, ललित येवले, मोहन शिंदे (पिंप्री), सिराज कुरेशी, गुलाबराव मराठे, किरण अग्निहोत्री, गुलाम गौस, विलास महाजन, खालीक अहिलेकार, तौसिफ पटेल, व्ही. टी. माळी, गोरख देशमुख, शोनोद्दीन जनाब, धिरेंद्र पुरभे, बालू जाधव, योगेश येवले, राहुल रोकडे, रामचंद्र माळी उपस्थित होते.