
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील वाघनगर परिसरातील श्रीराम चौकामधील रहिवासी तुषार भाऊसाहेब सिरसाठ (वय ३०) हे दि. २४ ऑक्टोबर रोजी बाहेरगावी गेलेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, ५ ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, १ ग्रॅमची फुली, चांदीचे जोडवे, चांदीचे कडे असे एकूण ३७ हजार ३०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. या सोबतच शेजारी राहणाऱ्या पूजा दिनकर मोरे यांच्या घरातून १४ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर तुषार सिरसाठ यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















