धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी. आर.हायस्कूल मध्ये आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोविड प्रतिबंधक लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. यात शाळेतील पंधरा वर्षे वयोगटावरील १२८ विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली तर ग्रामीण रुग्णालयाने राबविलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत याआधी दिडशे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतलेली आहे. शाळेतील जवळ जवळ तीनशेवर विद्यार्थी लसवंत झालेले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व विशद केले.यावेळी उपमुख्याध्यापक आर.के.सपकाळे, पर्यवेक्षिका डॉ सौ. आशा शिरसाठ, एनसीसी आॅफिसर डी.एस.पाटील, ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ, बी.डी.शिरसाठ, उमाकांत बोरसे यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी डॉ.मयुर जैन यांच्या मार्गदर्शनात सोनार सिस्टर, मोरावकर सिस्टर, भदाणे सिस्टर, आरोग्य सहाय्यक पी.एस. भदाणे, आरोग्य सेवक आर.के. देशमुख, महेंद्र माळी, फार्मसिस्ट दिनेश बडगुजर व केतन चौधरी या कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.