TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आपण कोठे चुकलो व त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे हे आपणास समजून घ्यावे लागेल. आपण हे करण्यात जर यशस्वी झालात तर आपण सर्व क्षेत्रात प्रगती करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडा थकवा जाणवेल. ते खूप मेहनत करत असल्याने त्यांनी थोडी विश्रांती घ्यावी. आपण आपल्या नवीन व्यावसायिक सौद्यातून नफा मिळवू शकाल. व्यावसायिक भागीदार आपला व्यवसाय वाढविण्यात मदत करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त परिस्थितीत सुद्धा प्रेम व रोमांसाने भरलेले असेल.

वृषभ : आपण आपल्या प्रेमिकेशी खूपच प्रेमाने बोलाल. एकमेकांच्या हृदयात स्थान दृढ कराल, व त्यामुळे आपले संबंध खूप चांगले होतील. कदाचित प्रणयी जीवनाचे रूपांतर विवाहात होऊ शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन मात्र सामान्यच राहील. वैवाहिक जोडीदाराची प्रकृती आपल्या काळजीत भर घालण्याची संभावना आहे. काही कारणाने कुटुंबियांशी आपले भांडण संभवते. हिंमत ठेवून त्यांचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यास कुटुंबियांचे आपणास सहकार्य सुद्धा मिळू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण काही नवीन गोष्टी करू शकाल.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : आठवड्याची सुरवात खूपच चांगली होईल. आपण कुटुंबावर आपले लक्ष केंद्रित करू शकाल. काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपले प्रणयी जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. थोडे तणाव असले तरी सुद्धा संबंधातील प्रेम व रोमांस टिकून राहील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात मानसिक चिंता वाढतील. काही किरकोळ खर्च सुद्धा होतील. अनावश्यक प्रवास करणे टाळावे. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद झाले तरी अधून मधून तणाव निर्माण होताना दिसून येईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात आपली मेहनत वाढवावी लागेल. आपणास अतिरिक्त जवाबदारी घेण्याची तयारी ठेवावी लागेल.

कर्क : आपणास उपयुक्त ठरतील अशा दीर्घकालीन योजना आपण आखाल. नोकरी करणाऱ्यांनी ह्या आठवड्यात काळजीपूर्वक काम करावे. आपली कामगिरी चांगली झाली तरी कामाच्या ठिकाणी असलेले आपले विरोधक आपल्या विरुद्ध तक्रार करू शकतील. तेव्हा सावध राहावे. हा आठवडा विवाहितांसाठी खूपच चांगला आहे. आपला वैवाहिक जोडीदार आपल्यावर खुश होऊन आपणास सुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. प्रेमीजनांची ह्या आठवड्यात काहीशी निराशा होईल. आपणास आपल्या प्रेमिकेची वागणूक आवडणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. काहीजण उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यात यशस्वी होतील.

सिंह : आठवड्याच्या सुरवातीस आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. कुटुंबात काही विशेष गोष्टींवर चर्चा होईल. आपण कुटुंबियांना आपला अभिप्राय सुद्धा द्याल. शेजारी किंवा नातेवाईकांशी काही कारणाने वाद होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे. आपण आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करून पुढे जाऊ शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास कार्यात यश प्राप्त होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परंतु, आपण एकमेकांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच संबंधातील प्रेम टिकवू शकाल, अन्यथा समस्या वाढू शकतात.

कन्या : आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैसा येईल. बँकेतील शिल्लक वाढेल. सासुरवाडी कडील लोकांची भेट संभवते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाची गती वाढवतील. कार्यालयात एखाद्यावर रागावल्याने आपण अडचणीत येण्याची संभावना असल्याने अशा परिस्थिती पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. असे असून सुद्धा आपली कामगिरी उत्तम झाल्याने आपणास लाभ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल.

तूळ : आपण नवीन दृष्टिकोनाने वस्तूंकडे पाहू लागाल. आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनात बदल होईल. आपणास प्राप्ती सुद्धा चांगली होईल. आपल्यातील बदल आपणास जाणवू लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास पूर्वीपेक्षा जास्त महत्व देऊ लागाल. प्रेमीजनांना संबंधातील सार समजल्याने आपल्या प्रेमिकेसाठी ते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांची कामात धावपळ होईल. व्यापारी आपल्या व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होतील. कामा निमित्त आपण प्रवास करू शकाल.

वृश्चिक : आपण आजवर जे काही कमावले होते ते खर्च करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे जलद गतीने पैसे कमी होऊ लागतील. तेव्हा सावध राहावे. आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी. आपण आजारी पडण्याची संभावना असून एखाद्या रोगाची लागण आपणास होण्याची शक्यता सुद्धा आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल्याने आपले व्यक्तिगत संबंध कमकुवत होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. भविष्यात आपले संबंध अधिक प्रेमळ होण्यासाठी आपण आपल्या संबंधांच्या बाबतीत काही नवीन निर्णय घ्याल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.

धनु : ह्या आठवड्यात आपणास खूप चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ होऊन खर्चात कपात होईल. आपण आर्थिक दृष्ट्या सबळ व्हाल. आपली प्रकृती सुद्धा उत्तम राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुदृढपणे वाटचाल करेल. परंतु, आपला वैवाहिक जोडीदार रागाच्या भरात आपणास काही बोलण्याची संभावना असल्याने सावध राहावे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधात रोमांस व समर्पण दोन्ही राहतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास मेहनत वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रतिकूल आहे.

मकर : आपण जरी खूप प्रयत्न केलेले नसले तरी सुद्धा यशस्वी होण्याची संधी आपणास मिळेल. नशिबाची साथ मिळाल्याने जे प्रयोग आपण करू इच्छिता ते करू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामास गती येईल. असे असून सुद्धा अधून मधून कामा वरून आपले लक्ष उडण्याची संभावना आहे. परंतु, परत आपण काम करून चांगले परिणाम मिळवू शकाल. आपणास बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन काही करण्याचा आहे. काही नवीन प्रयोग केल्याने आपणास लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडेल.

कुंभ : आपल्यात चांगला समन्वय राहिल्याने संपूर्ण परिस्थिती आटोक्यात राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या संबंधात वाढत जाणाऱ्या तणावामुळे एकमेकांतील अंतर वाढू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. कामा निमित्त आपणास भरपूर प्रवास करावे लागतील. दीर्घ काळ प्रवास केल्याने आपणास थकवा जाणवेल. परंतु आपणास प्रवासाचे सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील. तरी सुद्धा त्यांना नोकरीत बदल करावेसे वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.

मीन : आपण आपल्या व्यवसायाच्या बाबतीत खूप चिंतीत व्हाल. व्यवसायातील काही बाबी ह्या चिंता वाढविणाऱ्या असल्याने हे असे होईल. शांत राहून काम करावे. असे केल्याने आपण आव्हानांना सहजपणे सामोरे जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. असे असून सुद्धा वरिष्ठांशी काही ना काही कारणाने आपले भांडण होण्याची संभावना आहे, तेव्हा सावध राहावे. अन्यथा भांडणाचा परिणाम आपल्या कामगिरीवर होऊ शकते. विवाहितांना आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या वागणुकीत सकारात्मक बदल झाल्याचे जाणवेल. आपला वैवाहिक जोडीदार तर्कशुद्ध गोष्टी करण्यास सुरवात करेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

जामठी येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच दुकाने फोडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Could Red Dog Be Just The Right Casino For You, Even Without Live Games?

November 20, 2022

तापी नदीच्या पुलावरून महिलेने घेतली उडी, सुदैवाने बचावली

January 13, 2025

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त रक्तदान शिबीर ; एकनाथराव खडसे यांची विशेष उपस्थिती

October 31, 2020

एरंडोल तालुक्यात तरुणाचा सिनेस्टाईल खून ; मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने केले वार !

March 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group