TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 27 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2022 !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजपर्यंतच्या उधारीसाठी तणाव घेत होता तो आता राहणार नाही. व्यवसायातील उधारी वेळेत जमा होईल. नोकरदार वर्गाच्या कामाची जबाबदारी वाढणार आहे. त्यासाठी वरिष्ठांना दुखवून चालणार नाही. खर्च होईल, पण तो करणे गरजेचेच राहील. समाजसेवा करण्याचा मोह आवरा. मित्र परिवाराकडून आलेले प्रस्ताव स्वीकारा. नातेसंबंध दृढ होतील. भावंडांशी जवळीक साधाल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. दिनांक २ व ३ हे दोन दिवस फक्त महत्त्वाचे निर्णय घेऊ नका; आणि घेतलेच गेले तर असे वाटेल की हा निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला असता तर बरे झाले असते, असे नंतर वाटण्यापेक्षा हे दोन दिवस पुढे ढकला. बाकी दिवस शुभदायक असतील.

वृषभ : व्यवसायातसुद्धा जसे नियोजन केलेले आहे तसेच होईल. त्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत. नोकरदार वर्गाची कामामध्ये होत असलेली धावपळ कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हाल. राजकीय क्षेत्रातील डावपेच वेळीच लक्षात येतील. दिनांक २७ रोजीचा एकच दिवस म्हणावं असा अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. बऱ्याच दिवसांतून हे लाभदायक भ्रमण समाधान वाढवणारे आहे. कर्जाचे प्रकरण याबाबतीत लवकर निर्णय घ्या. प्रत्येक दिवस यश देणारा ठरवा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार लाभतील. प्रेरणादायक घटना घडेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : भागीदारी व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. परिश्रमाचे फळ मिळेल. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड कराल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. आर्थिकदृष्टय़ा धनलाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी होईल. दिनांक २८, २९ रोजी ज्या गोष्टींची आवश्यकता नाही अशा गोष्टींचा मोह निर्माण होईल. मात्र हा मोह थोडक्यातच आवरणे योग्य राहील. अन्यथा ध्यानीमनी नसतानासुद्धा फायद्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकते. हे दोन दिवस काळजीपूर्वक हाताळा. त्यानंतरचा कालावधी उत्तम राहील.

कर्क : सध्या ऊन-सावलीप्रमाणे दिवस असणार आहेत. म्हणजेच आपल्याला सतर्क राहूनच पाऊल टाकावे लागेल. सध्या मनासारखी कामं होण्यासाठी धीर धरावा लागेल. प्रत्येक गोष्टींमध्ये दोन शब्द कमी बोलून वाटचाल कशी सुरळीत चालू ठेवता येईल हे बघा. व्यवसायात जास्त नफ्याच्या मागे न लागता आहे त्यातच समाधान मानायला शिका. नोकरदार वर्गाने कामामध्ये इतरांचा सल्ला न घेतलेला चांगला. खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात नको ती जबाबदारी घेऊ नका.

सिंह : मनस्तापाच्या गोष्टी स्वत:हून ओढवून घ्यायच्या नाहीत हे लक्षात ठेवा. एखाद्याला चांगला सल्ला द्यायला जरी गेला, तरी समोरच्याचा गैरसमज निर्माण होणार आहे असे वातावरण आहे. अशा वातावरणात शांत राहिलेले चांगले. प्रसंग कसाही असो मात्र वादविवाद टाळा. व्यवसायात समोरून येणाऱ्या प्रस्तावाला बळी पडू नका. घाईगडबडीने घेतलेले निर्णय सध्या चांगले राहणार नाहीत. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. खर्च मर्यादित ठेवा.

कन्या : व्यवसायात कला-कौशल्याला वाव मिळेल. ग्राहकांच्या मागण्या वेळेत पूर्ण कराल. नोकरदार वर्गाला कामासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. दुसऱ्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे हे लक्षात ठेवा. खर्चाचा मोह आवरा. समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने कराल. मित्र परिवाराशी क्षुल्लक कारणावरून गैरसमज टाळा. मुलांचा हट्ट महागात पडेल. दिनांक २ आणि ३ रोजी आळस बाजूला सारून कामाचे नियोजन करावे लागेल. जबाबदारीच्या गोष्टी इतरांवर टाकून चालणार नाहीत. या दोन दिवसांत थोडी धावपळ होणार आहे, त्यामुळे चिडचिड होईल. त्यासाठी स्वत:वर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.

तूळ : व्यवसायातील आवक -जावक चांगली राहिली तरी गुंतवणूक जपून करा. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास टाकून चालणार नाही. नोकरदार वर्गाला कामामध्ये चौफेर लक्ष ठेवावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा पाठबळ चांगले जरी असले, तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. राजकीय क्षेत्रातील दबावतंत्र कमी होईल. दिनांक २, ३ रोजी ज्या गोष्टी आपल्याला झेपणार नाहीत अशा गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. एखादी गोष्ट अंगलट येत आहे असे माहीत असतानासुद्धा स्वत:हून त्या गोष्टीच्या जवळ जाणे त्रासाचे राहील. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करा. बाकी दिवस उत्तम जातील.

वृश्चिक : व्यवसायात यशस्वी भरारी माराल. स्वतंत्र व्यावसायिकांना दिलासा मिळेल. मनासारखे व्यवहार होतील. फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरदार वर्गाचे वरिष्ठांविषयी असलेले गैरसमज दूर होतील. कामातील अडचणी कमी होतील. आर्थिकदृष्टय़ा स्थान मजबूत होईल. सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. असे चांगले दिवस असताना कोणतेही निर्णय घ्यायला उशीर करू नका. प्रत्येक गोष्ट वेळेत कशी करता येईल हे बघा. लांबणीवर गेलेली कामे पूर्ण होतील. सुरुवातीस वाटणारा उत्साह कायम टिकवून ठेवा.

धनू : स्वत:च्या गरजांपुरता विचार करा. इतरांच्यात डोकावून पाहू नका. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणे योग्य राहील. त्याचा आगामी काळासाठी विचार करा. नवीन व्यवसायाला सुरुवात होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये होणारी दगदग कमी होईल. आर्थिक व्यवहार रोखठोक होतील. सप्ताहात कोणता ना कोणता तरी दिवस त्रासाचा जातो. त्यामुळे प्रत्येक दिवस कसा जाईल याचीच हुरहुर मनाला लागते. सध्या मात्र सर्वच दिवस चांगले असल्यामुळे कोणतेही काम करायला हुरूप वाटेल. सर्वच दिवस चांगले आहेत म्हणून भलतीच जबाबदारी घेऊन बसू नका.

मकर : व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले राहील. भागीदारी व्यवसायात हिशोबाच्या संदर्भात जे गैरसमज निर्माण झाले होते, ते मिटण्याच्या मार्गावर असतील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक बाबतीत विशेष लाभ होतील. समाजसेवेच्या माध्यमातून सेवाकार्य घडेल. भावंडांच्या संदर्भात आनंदाची बातमी कळेल. दिनांक २७ रोजी नवीन कामाचा श्री गणेशा करू नका. या दिवशी महत्त्वाचे काम करू नका. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. आतापर्यंत ज्या गोष्टीविषयी निराशा वाटत होती ती निराशा आता दूर होईल. उशिरा का होईना चांगल्या गोष्टींचे फळ मिळाल्याचा आनंद होईल.

कुंभ : इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळाढवळ करू नका. बाकी दिवस चांगले असतील. या चांगल्या दिवसांमध्ये येणारे जे प्रस्ताव असतील ते लाभदायक ठरतील. हे प्रस्ताव स्वीकारण्यास हरकत नाही. व्यवसायातील उधारी जमा होईल. गुंतवणूक करणे सहज शक्य होईल. नोकरदार वर्गाला जर वरिष्ठांशी काही चर्चा करावयाची असेल तर थोडे दिवस थांबा. आर्थिकदृष्टय़ा आघाडी मिळवाल. दिनांक २८, २९ रोजीचे दोन दिवस संयम ठेवून वागावे लागेल. एखाद्या व्यक्तीचा राग जरी आला तरी तो पटकन बोलून दाखवणे त्रासाचे राहील. त्यापेक्षा हे दोन दिवस शांत राहिलेले चांगले.

मीन : व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टींच्या आहारी जाऊ नका. मागील कमतरता भरून काढण्यासाठी उधारीचा व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाचे वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आर्थिकदृष्टय़ा बचत करणे योग्य राहील. समाजसेवेसाठी इतरांची मदत घ्याल. व्यसनी मित्रांपासून लांब राहा. मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे वेळीच लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन खरेदीचे बेत ठरवाल. दिनांक ३०, १ हे दोन दिवस कोणत्याच गोष्टीवर चर्चा करू नका. शाब्दिक वादविवाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. या चांगल्या असलेल्या कालावधीत अस्थिर गोष्टी स्थिर होतील. निर्णयक्षमता उत्तम राहील. प्रयत्नांना यश मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

संविधान दिनाच्या निमित्ताने पी.आर.हायस्कूलची अभूतपूर्व संविधान रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खोटं बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच : रोहित पवार

July 10, 2021

Horoscope : राशीभविष्य, शनिवार १६ जुलै २०२२ !

July 16, 2022

पुण्यातील व्यावसायिक मालक लघवीला जाताच ड्रायव्हरने केला ‘भलताच’ प्रताप !

October 8, 2021

लेफ्टनंट जनरल ‘मनोज पांडे’ भारताचे नवीन लष्कर प्रमुख

April 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group