TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझे प्रकरणात बोलण्याचा अधिकार तरी काय ? : अनिल गोटे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात गेल्या पाच वर्षात गृहविभागाची अक्षरश: वाट लागली आहे. सचिन वाझेंच्या नावाने दिवसरात्र टाहो फोडणाऱ्या भाजपा नेत्यांनीच गृहखात्याची शिस्त मोडीत काढली. धुळे जिल्ह्यातील दादासाहेब रावल सरकारी बँकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास सिध्द आरोपीने केलेल्या साध्या कागदावरील अर्जावर एका रात्रीत बदलून राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे सुपूर्त करण्याचे आदेश देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझे प्रकरणात बोलण्याचा अधिकार तरी काय ?, असे सवाल करणारे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्द केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील नवरत्नांपैकी जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने नियुक्त करण्यात आलेल्या एस.आय.टी. ने दि. २२ ऑगस्ट २०१५ रोजी तपास पुर्ण करुन जयकुमार रावलांना अटक करण्याची व अटक करण्याकामी जास्त पोलीस कुमक देण्याची परवानगी तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागतली होती.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

सदर घटनेची कुणकूण रावलांना लागताच सदर गुन्ह्यात अटक करण्यासाठी परवानगी मागितलेल्या जयकुमार रावल यांच्या सहआरोपीच्या अर्जावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याऐवजी संपुर्ण तपासच राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला. या अर्जावरील २०/८ खोटीच तारीख टाकली. देवेंद्र फडणवीसांनी श्री. खाडे असा शेरा मारुन २४/८ अशी तारीख टाकली आहे. रावलांवर भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाल्यानंतर तपासी यंत्रणा बदलली. विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गुन्हे विभागाचे तत्कालीन आयुक्त श्री. देवेन भारती यांनी या गुन्ह्याचा तपास आम्ही करु शकत नाही’. सदर तपास करण्यासाठी आपले सी.आय.डी. खाते असमर्थ आहे. असे, स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना कळविले होते. पण, केवळ आणि केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याकरीता फडणवीसांनी एकारात्रीत तपासी यंत्रणा बदलली.

काँग्रेसचे जुने नेते डॉ. हेमंत देशमुख याना ८२ वर्षाच्या गृहस्थाविरुध्द ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद खंडपीठाने सदर गुन्हा घडलाच नाही. असे स्पष्टपणे मत नोंदवून एफ.आय.आर. रद्द केला. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याविरुध्द कठोर करवाई करण्याचे न्यायालयाने आदेशीत केले. याच अधिकाऱ्याची अमरावती येथे झालेली बदली स्थगीत करुन त्याला प्रतिनियुक्तीवर रावलांचे वास्तव्य असलेल्या दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवले. आजपर्यंत कुठलाही पोलीस कॉन्स्टेबल मंत्र्याच्या कार्यालयात ऑफीसर ऑन स्पेशल ड्युटी यापदावर नियुक्त झाला नव्हता. परंतु फडणवीसांच्या कालखंडात धुळे येथील पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार रावल यांच्या कार्यालयात रीतसर ओ.एस.डी. म्हणून कार्यरत होता. अशा एक नव्हे अनेक भानगडी आपल्या कालखंडात मुक्तपणे घडवून आणलेल्या फडणवीसांना सचिन वाझे प्रकरणात बोलण्याचा अधिकारच काय ?

पंधराशे एकर क्षेत्रावर गांजाचे उत्पादन, मोटारसायकल चोरीत प्रत्यक्ष सहभाग असलेले गुन्हेगार मंत्र्यांच्या कार्यालयात काम करु शकतात कसे ?, अनिल गोटे यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांच्या काळातील भ्रष्ट व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द राज्याचे गृहमंत्री कार्यवाही करणार तरी कधी ? राज्यशासनाला माझे खुले आवाहन आहे की, या सर्व प्रकरणाचा तपास आपण नेमका करणार तर, कधी देवेंद्र फडणवीसांच्या भ्रष्ट व गैर कारभाराची चौकशी लावा पोत्यांनी भानगडी मागून भानगडी बाहेर येतील. निरपराधांना, बलात्कार तसेच वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकवून ब्लॅकमेलींग करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द पुराव्यानिशी तक्रार करुन कार्यवाही का होत नाही ? पंधराशे एकर क्षेत्रावर गांजाचे उत्पादन, मोटारसायकल चोरीत प्रत्यक्ष सहभाग असलेले गुन्हेगार मंत्र्यांच्या कार्यालयात काम करु शकतात कसे ?, असे सवाल करणारे पत्रक अनिल गोटे यांनी प्रसिध्द केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

उमेदवारीबाबतचे आक्षेप पीठासीन अधिकार्‍यांनी फेटाळून लावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ; पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल !

July 3, 2025

राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी तसीन, आरुष, सानिया, मितेश, श्रेयस यांची निवड !

March 27, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 एप्रिल 2024 !

April 6, 2024

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात : रावसाहेब दानवे

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group